रेमडिसिव्हर इंजेक्शन्सची काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या दोन जणांना अटक

  रेमडिसिव्हर इंजेक्शन्सची काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या दोन जणांना अटक


भाईंदर - सध्या राज्यात ज्या इंजेक्शन्सचा तुटवडा सुरू आहे त्यावर बहुतांश ठिकाणी काळाबाजारी सुरू आहे, असाच एक प्रकार नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत योगेश संतोष पवार (२१), महिला अस्मिता नारायण पवार (२१) हे एक रेमडिसिव्हर इंजेक्शन तब्बल १६ हजार रुपये किमतीला काळ्या बाजारात विकत असताना अमित काळे पोलीस उपायुक्त यांनी कारवाई केली आहे.

हा गैरप्रकार सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मीरा भाईंदर परिमंडळ १ यांनी मीरारोडच्या हद्दीतील नयानगर भागात रेमडीसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. आरोपीकडून पोलिसांनी एकूण पाच इंजेक्शन हस्तगत केले आहेत तर रेमडीसीवर इंजेक्शन आरोपीने कुठून आणले याचा तपास पोलीस करत आहेत. मीरा भाईंदर शहरात दोन व्यक्ती रेमडीसीवर इंजेक्शन काळाबाजार करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमित काळे यांना मिळाली होती. त्यानुसार बोगस ग्राहक पाठवून त्यांनी तब्बल एक रेमडिसिव्हर इंजेक्शन १६ हजाराला विकत असल्याचे पोलिसांना निष्पन्न झाले. यामध्ये पोलिसांनी दोन जणांना अटक करून ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्या आरोपींना २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर पुढील अधिक तपास सुहेल पठाण पोलीस उपनिरीक्षक नयानगर पोलीस ठाणे हे करत आहेत.