मीरा भाईंदर दुकाने , भाजी मार्केट ५ दिवस बंद
भाईंदर - मीरा भाईंदर महापालिकेचे आयूक्त चद्रकांत डांगे यांनी १३ मे ते १७ मे पर्यंत मीरा भाईंदर शहर पूर्ण बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये बिग बाजार,डी मार्ट, शॉपिंग मॉल,किराना दुकान ,भाजी मार्केट, फळाची दुकाने, बेकरी, मटन, मच्छी,चिकन ही सर्व दुकाने १३ मे ते १७ मे अशी पाच दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
यापूर्वी अन्नधान्याची दुकाने जसे डिमार्ट ,स्टार बाजार,बिग बाजार, बेकरी, शॉपिंग मॉल रोज सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत सुरू होती ती दुकानेही आता ५ दिवस बंद असणार आहेत.
दूध डेरी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू असतील , तसेच मटणची दुकाने सकाळी ९ ते रात्री ११ वाजेपर्यंत फक्त होम डिलिव्हरी करू शकतात , नागरिकांना फक्त होम डिलिव्हरीच मागवता येईल. त्याचप्रमाणे सुभाषचंद्रबोस मैदानाजवळ सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत मच्छी मिळेल. अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने, दवाखाने सुरू राहतील. काही दिवसांपूर्वी शहरात रुग्ण संख्येत वाढ झाल्यामुळे याचे प्रमाण कमी व्हावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील नागरिकांनी नियमाचे पालन करावे, आपल्याला कोरोनाच्या संकटावर लवकर लवकर नियंत्रण मिळवता यावे यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे व स्वतः सुरक्षित रहावे व आपले शहर सुरक्षित ठेवावे असे आवाहन आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी केले आहे.