मिरा-भाईंदर शहर सॅनिटायझर करणार,  आ.सरनाईक यांचा उपक्रम

मिरा-भाईंदर शहर सॅनिटायझर करणार,  आ.सरनाईक यांचा उपक्रम


मिरारोड : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी मिरा- भाईंदर शहर पूर्ण सॅनिटायझर करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
 मीरा भाईंदर शहरात अनेक इमारती व वस्त्या आहेत तेथे पालिका प्रशासन पोहोचू शकत नाही. अशी अनेक ठिकाणे आहेत. त्यासाठी अनेकांची मागणी होती की सॅनिटायझर मारण्याची व्यवस्था झाली पाहिजे त्यानुसार 
  शहरातील इमारती व वस्त्यांमध्ये मोफत सॅनिटायझर फवारणी करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी २५ व्यक्तीना सॅनिटायझर फवारणीसाठी तयार करण्यात आले आहे. त्यांच्या संरक्षणार्थ पीपीइ किट परिधान करून विभागात फवारणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे आपल्या मतदारसंघाव्यतिरिक्त संपूर्ण मिरा-भाईंदर शहरात ही फवारणी केली जाणार आहे.त्यामुळे सरनाईक यांचे शहरात कौतुक केले जात आहे.आमदार प्रताप सरनाईक यांनी सुरू केलेल्या भाजी वाटप कार्यक्रमास शहरात उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरात सर्वत्र जंतुनाशक औषध फवारणीची गरज असताना अद्यापही काही ठिकाणी फवारणी झालेली नाही.१० मे ते १० जुलै २०२० पर्यंत मान्सूनपूर्व आजार लक्षात घेता फवारणी सुरू राहील अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली.दरम्यान ज्या सोसायटीमध्ये अथवा जिथे औषध फवारणीची गरज आहे त्यांनी कार्यालयाशी ०२२-२८११५०५० किंवा वॉटसअप क्रमांक ९१३६५४९१७२ वर संपर्क करावा असे आवाहन आ. सरनाईक यांनी केले आहे.