मीरा भाईंदरच्या समाजसेवकांकडून गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप
भाईंदर- २२ मार्च ला लाॅकडाउन सुरू झाल्यापासुन आतापर्यंत मीरा भाईंदरच्या अनेक समाजसेवकांनी एकत्र येत गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करत आहेत. मीरा भाईंदर शहरातील प्रविण उत्तेकर, कमलेश अंबानी, अश्विन सागर, मुन्ना सिंह असे अनेक जण एकत्र आले. आपल्या मिरा भाईदर शहराला आपली कर्म भुमी समजुन आणि आपली बांधिलकी समजून कोरोनाच्या लढाईत २५०० गोरगरीब कुटुंबांना त्यांच्या घरी जाऊन अन्न धान्य व जीवनावश्यक (तांदुळ , डाळ,आटा, तेल, साखर,चहा पावडर , हळद पावडर, मिरची पावडर, मीठ ) वस्तूचे वाटप केले. या समाजसेवकांनी शहरातील अनेक भागात अडकलेल्या गोरगरीब , गरजवंत यांना
मदत केली. मदत केल्यामुळे अशा परिस्थितीत त्यांना मोठी मदत झाली त्यामुळे मदत मिळालेल्या कुटुंबाने त्यांचे आभार मानले आहेत. हे मदत कार्य करण्यासाठी आकाश निधी सोसायटी, एन जी सिल्वर स्प्रिंग सोसायटी, सुंदरम साई करिष्मा सोसायटी, वंदना हाईटस सोसायटी, ह्यानीही हातभार लावला. तसेच गोराई ग्रुप चे अध्यक्ष कमलेश अंबानी यांनीही ७०० परिवाराला जीवनावश्यक वस्तू मिराभाईदर पालिकांच्या निदर्शनाखाली वाटप केले. प्रत्येकाने आपली सामाजिक बांधिलकी जपून मदत कार्य करण्यासाठी पुढे आले पाहिजे त्यामुळे गरजवंतांना मदत करणे शक्य होते तसेच आमच्या हातून असेच चांगले कार्य व गरजवंतांना मदत करण्याचे काम घडत राहो असे प्रवीण उत्तेकर यांनी सांगितले.