महापालिका हद्दीत स्वतंत्र ऑक्सिजन प्लांट उभारण्याची मागणी

 


महापालिका हद्दीत स्वतंत्र ऑक्सिजन  प्लांट उभारण्याची मागणी 

मिरारोड - मिरा भाईंदर महापालिका ह्द्द्दीत महापालीकेचा २०० बेडकरिता ५ के.एल क्षमतेचा स्वतंत्र ऑक्सिजन  प्लांट उभारण्याची मागणी माजी सभागृह नेते रोहिदास पाटील यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे. राज्यासह मिरा भाईंदर शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या वाढत्या रुग्णांना आरोग्य सेवा पुरवणे अवघड झाले आहे. मिरा भाईंदर महापालिका हद्दीत दररोज ४०० ते ५०० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. वाढती कोरोना रुग्णसंख्या ही अत्यंत चिंतेची बाब आहे. रुग्णांना ऑक्सिजनची नितात गरज आहे. ऑक्सिजनचा पुरवठा नसल्यामुळे सरकारी व खाजगी हॉस्पिटलमध्ये यापूर्वी अनेक रुग्णाचा मृत्यू  झाला आहे व आजही मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. मिरा भाईंदर महापालिका हद्दीतील  महापालिकेचे दवाखाने,खाजगी दवाखाने तसेच व्यावसायिक आस्थापने यांना ५० टन ऑक्सिजन ची गरज आहे. राज्यातील विविध महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपरिषदा ऑक्सिजन चा स्वतंत्र प्लाट उभा करण्याच्या प्रयत्नात आहे.  नागरिकांचे जीव वाचवणे हे प्रथम कर्तव्य याला महत्व देऊन मिरा भाईंदर महापालिका ह्द्द्दीत महापालीकेचा २०० बेडकरिता ५ के.एल क्षमतेचा स्वतंत्र ऑक्सिजन  प्लांट उभारावा अशी मागणी माजी सभागृह नेते रोहिदास पाटील यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे. ज्यामुळे  ऑक्सिजन  साठी महापालिका स्वावलंबी होईल. तसेच शहरातील नागरिकांना आरोग्यसेवेसाठी याचा फायदा होईल व यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण कमी होईल.