मिरा भाईंदर मध्ये कोरोना रुग्णामध्ये वाढ आजपर्यंत ९४५ जणांचा मृत्यू

 


मिरा भाईंदर मध्ये कोरोना रुग्णामध्ये वाढ

आजपर्यंत ९४५ जणांचा मृत्यू

मिरारोड - मिरा-भाईंदर शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णासंख्येमध्ये वाढ होत आहे. गेल्या पंधरा दिवसापासून दररोज ४०० पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत .तर  रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जास्त आहे. तर उपचारादरम्यान आजपर्यंत ९४५ रूग्णांचा मृत्यू   झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे . 

     मिरा भाईंदर शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनचा प्रादुर्भाव वाढत आहे. ठाणे जिल्यातील इतर महापालिकांच्या  तुलनेत मिरा-भाईंदर मध्ये बाधित रुग्णांचे प्रमाण कमी आहे . शहरातील कोरोना बाधित रूग्णांचा आकडा २१ एप्रिल पर्यंत ३९४१६ झाला आहे . तर ३४१९४ रुग्ण बरे झाले आहेत. २१ एप्रिलपर्यत ९४५ रूग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्यानेचिंता व्यक्त केली जात आहे . शहरात एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासूनच कोरोना बाधित रूग्णांचा  आकडा वाढत आहे .  सध्या ४ हजारहून अधिक रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार केले जात आहेत . पालिकेकडे  उपचारासाठी असणाऱ्या खाटा देखील कमी पडू लागल्या आहेत . त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागावर देखील ताण पडत आहे . दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शहरातील जनतेने कोरोना नियमांचे व लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी केले आहे.