पाटोदा ग्रामीण रुग्णालयात 30 ऑक्सिजन बेड मंजूर
पाटोदा - पाटोदा तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णासंख्येत वाढ होत असल्यामुळे रुग्णांना बेड उपलब्ध होत नव्हते. हे लक्षात घेता आमदार बाळासाहेब आजबे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गीते यांच्या बरोबर चर्चा करून 30 ऑक्सिजन बेड मंजूर करून घेतले आहेत. पाटोदा तालुक्यातील कोरना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पाटोदा ग्रामीण रुग्णालयात 30 ऑक्सिजन बेडची आमदार बाळासाहेब आजबे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गीते यांच्या बरोबर चर्चा करून 30 ऑक्सिजन बेड मंजूर करून घेतले आहेत. पाटोदा ग्रामीण रुग्णालयात जागेची पाहणी करून तात्काळ कामाला सुरुवात करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी तहसीलदार मुंडलोढ , तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ. राऊत ,एपीआय आंधळे ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते रामकृष्ण बांगर , आप्पासाहेब राख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष शिव भूषण जाधव, सय्यद वाहब, कल्याणराव भोसले ,संदीप डिडुळ ,विशाल जाधव , सरपंच बाळा बांगर ,डॉ. सानप, डॉ. प्रताप राख व इतर उपस्थित होते.