भाईंदर येथे कोळी बांधवांची हॉलीबॉल स्पर्धा संपन्न


भाईंदर -  भाईंदर पश्चिमेच्या उत्तन येथील मच्छीमार कोळीवाड्यात कोळी समाजातील नवशक्ती क्लब  पातानबंदर तर्फे गेल्या 35 वर्षांपासून गरीब व गरजू लोकांना मदत करणाऱ्या संस्थांना मदत करण्यासाठी पावसाळी हॉलीबॉल स्पर्धा खेळली जाते. याही वर्षी 15 ऑगस्ट 2020 रोजी शासन नियमांचे पालन करून ही स्पर्धा संपन्न झाली. या संकटात मच्छीमार कोळीबांधव मोठ्या आर्थिक संकटात आहेत असे असतानाही ही स्पर्धा घेण्याचे ठरवले कारण या स्पर्धेतून जमा होणारी रक्कम दरवर्षी गरीब व गरजू लोकांना मदत करणाऱ्या संस्थांना दिली जाते. ह्या स्पर्धेत महाराष्ट्रातील अनेक संघ सहभागी होत असतात परंतु यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे गावातीलच फक्त आठ संघांना शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून सहभागी करून घेण्यात आले यावर्षी यामध्ये ऑलराऊंडर संघाने प्रथम तर फाईव्ह स्टार संघ पातानबंदर यांनी द्वितीय पारितोषिक पटकावले.