निर्धार फाउंडेशनच्या वतीने नागनाथ मंदिर येथे वृक्षारोपण

 


निर्धार फाउंडेशनच्या वतीने नागनाथ मंदिर येथे वृक्षारोपन 


 


बीड - बीड तालुक्यातील श्रीक्षेत्र नागनाथ मंदिर देवस्थान मोरगाव येथे निर्धार फाउंडेशन मार्फत वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली आहे. कोरोनामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे.  या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून पर्यावरणाचे संतुलन , संरक्षण व सामाजिक स्वास्थ्यासाठी प्रयत्न करणे आपली जबाबदारी आहे.  या कर्तव्य भावनेतून निर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप कदम व सर्व पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून या वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले  होते . या कार्यक्रमामध्ये नागनाथ मंदिर परिसर व मंदिराकडे जाणार्‍या रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली. झाडे लावा, झाडे जगवा , वृक्षांची कत्तल करू नये व पर्यावरणाचे रक्षण हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असा संदेश मोहिमेच्या माध्यमातून देण्यात आला. त्याप्रसंगी नागनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष  बापूराव जाधव , मोरगावचे सरपंच मनोज पाठक , निर्धार फाउंडेशनचे रामेश्वर नाईकवाडे , दैनिक सूर्योदयचे प्रतिनिधी तुकाराम कागदे , सामाजिक कार्यकर्ते नवनाथ येडे , फाऊंडेशनचे समन्वयक महेंद्र ढास,  मनोज चव्हाण , राम गायकवाड,  कल्याण जाधव , बारीकराव भड, ओम जाधव , समाधान कागदे, गणेश कागदे सुंदर जाधव , नागनाथ तरुण मित्र मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.