पाटोदा नगरपंचायतच्या सभापती सौ.अनिता गिते कडुन ४०० गरीबांना भाजीपाला व किराणा वाटप
पाटोदा - कोरोना विषाणु या रोगाने अख्या जगात थैमान घातले असुन भारतही यात कमी नाही त्यामुळे सरकारने गेल्या दोन महीन्यापासुन लाॕकडाऊन केले असल्यामुळे सर्व व्यवहार व काम धंदे बंद असल्यामुळे गोरगरीब,शेतमजुर यांचे रोजगार बंद झाल्यामुळे त्यांच्या वर उपासमारीची वेळ आली असुन हातावर पोट असणा-या गोरगरीब, कष्टकरी गरजू अशा नागरिकांना आपणही समाजासाठी काही कर्तव्य म्हणुन पाटोदा नगरपंचायतच्या महीला बाल कल्याण सभापती सौ.अनिता श्रीहरी गिते यांनी प्रभाग क्रमांक सतरा मध्ये जवळजवळ चारशे गरीब गरजु वंताना भाजीपाला व किराणाचे घरोघरी जावुन काल वाटप केले असुन यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .
सध्या जगात नव्हे तर भारतात सुद्धा कोरोना विषाणूने थैमान घातले असुन लाॕकडावुन मुळे मोल मजुरी करणारे व हातावर पोट असणारे कष्टकरी यांची ऊपासमार होत असुन
आमदार सुरेश धस यांच्या सूचनेवरुन पाटोद्यातील गरीब गरजू रहिवाशांना पाटोदा नगरपंचायतच्या महीला बाल कल्याण सभापती सौ.अनिता श्रीहरी गिते व सर्व गिते पाटील यांच्या कुटुंबानी त्यांच्या प्रभाग क्रमांक सतरा मध्ये जवळजवळ चारशे कुटुंबाला भाजीपाला,गव्हाचा पाच किलो आटा व किराणा साहित्याचे काल घरपोंच वाटप केले आहे यामुळे ऐन संकटकाळात गोर गरीब नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असुन यावेळी आमदार सुरेश धस यांचे स्विय सहाय्यक सोमीनाथ कोल्हे,पत्रकार महेश बेदरे,पत्रकार पोपट कोल्हे,श्रीहरी गिते बापु,पत्रकार संजय सानप,पत्रकार अजिज शेख,प्रकाश गिते पाटील, मुकूंद गिते पाटील,दत्तात्रय गिते पाटील,अनिल गिते पाटील हे उपस्थित होते. या केलेल्या या मदतीबद्दल कष्टकरी व मोलमजुरी करणाऱ्या घटकांनी समाधान व्यक्त केले असून घरपोंच किराणा मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.