रेल्वे १२ मे पासून सुरु होणार,  अडकलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा 

 रेल्वे १२ मे पासून सुरु होणार, 
अडकलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा



दिल्ली - केंद्र शासनाने २५ मार्चपासून लॉक डाऊन जाहीर केला. यामध्ये अनेक प्रवाशी , मजूर, कामगार, विद्यार्थी विविध ठिकाणी अडकून पडले होते. त्यांना आपापल्या गावी जाण्यासाठी केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये मोठा निर्णय घेतला आहे.  रेल्वे विभाग १२ मेपासून टप्प्याटप्प्याने प्रवासी रेल्वेगाड्या सुरु करणार आहे. सुरुवातीला १२ मे रोजी देशभरातील १५ रेल्वे स्टेशनदरम्यान १५ गाड्या सुरु होतील. या गाड्याच्या ३० फेऱ्या होतील. या रेल्वे गाड्यांसाठी ११ मे रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. रेल्वेच्या irctc या अधिकृत वेबसाईटवर आणि अॅपवर तिकीट बूक करता येणार आहे. यामुळे देशभरात विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
१२ मे ला सुरु होणाऱ्या रेल्वे गाड्या विशेष रेल्वे म्हणून सुरु होतील. या विशेष रेल्वे नवी दिल्ली , आगरताळा, हावरा, पटना, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिंकदराबाद, बंगळुरु, चेन्नई, तिरुअनंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू तावी या १५ रेल्वे स्टेशन दरम्यान प्रवासी वाहतूक करतील. त्यामुळे देशभरात अडकून पडलेल्या प्रवाशांना या ठिकाणांहून आपल्या गावी जाण्यासाठी  प्रवास करता येईल. अडकून पडलेल्या प्रवाशांना या रेल्वेच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने उशिरा का होईना परंतु हा निर्णय घेतल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. काही नागरिकांचे म्हणणे आहे की सुरक्षा संभाळत हा निर्णय अगोदरच घेतला असता तर सामान्य नागरिकांचे एवढे हाल झाले नसते तसेच कोरोना रुग्णांच्या संख्येतही एवढी वाढ झाली नसती. अनेकांनी गावी जाण्यासाठी इकडे तिकडे धावपळ केल्यामुळे रुग्ण संख्येत वाढ झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.