फ्रिजच्या शॉर्टसर्किटमुळे घराला आग , घर जळून खाक
मिरारोड - मिरारोड परिसरातील सुंदर नगर कॉम्प्लेक्स मधील विघ्नहर्ता दर्शन या इमारतीत फ्रिजच्या सॉर्टसर्किट मुळे घराला आग लागली या आगीत घर जळून खाक झाले आहे.
सुंदर नगर येथील विग्नहर्ता इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील एका घरात जुन्या फ्रिज मध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. या आगीत घरातील सर्व सामान जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. आग दुपारी लागल्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. जगावर कोरोनाचे संकट कोसळले असताना आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे .त्यामुळे त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या त्यांनी ही आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न करत तीस मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले . या आगीमध्ये जवळपास चार लाख रुपयांचे सामान जळाल्याची माहिती मिळत आहे . सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही . आग ही शॉटसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे यांनी दिली आहे.