नवघर पोलिस स्टेशन वादाच्या भोवऱ्यात
दुकानदाराने केलेली तक्रार मागे घेण्यासाठी दबाव
भाईंदर - भाईंदर मधील नवघर पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी नवघर रोड येथील श्रीराम ज्वेलर्सच्या समोर दर्शन केमिस्ट मेडिकल आहे. या दुकानदारांने त्याच्याकडून काही पोलीस कर्मचाऱ्यांनी पैसे मगितल्याची तक्रार पोलिस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांच्याकडे दाखल केल्यामुळे नवघर पोलिस स्टेशन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. दुकानदाराने दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांकडून दबाव आणला जात असल्याची माहिती मिळत आहे.
भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलिस ठाण्याच्या हद्दीतच नवघर रोड येथील श्रीराम ज्वेलर्सच्या समोरच्या बाजूला रामफेर शुक्ला यांच्या मालकीचे दर्शन केमिस्ट मेडिकल आहे. लॉक डाऊन च्या काळात मेडिकल चालकांना फक्त औषधे विकण्याची परवानगी आहे , इतर कोणत्याही वस्तू विकता येत नाहीत. परंतु त्या मेडिकल चालकाने रेडबुल हे 'थंड शीतपेय' विकल्या प्रकरणी मेडिकल मालकाला व काम करणाऱ्या फार्मासिस्ट यांना पोलिसांनी पकडून नवघर पोलीस ठाण्यात आणले. त्यावेळी तुम्ही एक लाख द्या अन्यथा तुमच्यावर गुन्हा दाखल होणार व तुम्हाला तीन महिने जेल मध्ये राहावे लागेल व मेडीकल दुकानाचा परवानाही रद्द होईल अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांच्यामध्ये एका मध्यस्थी व्यक्तीने मध्यस्थी करून हा सौदा वीस हजार रुपयांवर केला. परंतु त्याअगोदर त्या मेडिकल चालकांचे कपडे काढून त्याची चौकशी करण्यात आली व त्याच्या खिशातील सात हजार रुपये काढून घेण्यात आले आणि त्याच्या बोटातील अंगठी काढण्याचा प्रयत्न केला, तेंव्हा मध्यस्थी व्यक्तीने म्हटले की एकजण पैसे घेऊन येत आहे असे म्हणत आलेल्या माणसाने बारा हजार तीनशे रुपये त्यांना दिले तेव्हा त्या दुकानदाराला पोलिसांनी सोडून दिले. त्यानंतर दुकानदाराने घडलेल्या घटनेची पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
नवघर पोलीस ठाण्यातील कर्मचारी किरण घुगे व दोन पोलीस सहकारी यांनी व त्यांच्या सोबत असलेल्या कर्मचारी यांनी नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट केस करण्याच्या काही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. घुगे हे अवैध धंदे चालवणाऱ्याकडून कलेक्शन करण्याचे काम करत असल्याची चर्चा सुरू आहे. हया मेडिकल व्यावसायिकांडून पैसे घेतल्याचा आरोप झाल्याने हे पोलिस स्टेशन वादग्रस्त ठरले होते. या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह इतर पोलिसांची नावे आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन भाईंदर उपविभागीय अधिकारी शशिकांत भोसले यांनी तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, ह्या तपासामध्ये नेमका अर्थ काय लावतील, व कोण कोण कर्मचारी अधिकारी यांचा समावेश आहे, याचा उलगडा करण्याचे काम सुरू आहे. या घटनेची चौकशी करून लगेेेच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. मेडिकल व्यावसायिक रामफेर शुक्ला यांनी पोलिसांनी घेऊन गेलेल्या माणसांना सोडण्यासाठी एक लाखांची मागणी केल्याचे सांगितले. त्यांच्या नातेवाइकांकडून वीस हजार घेतले आहेत तसेच आणखी पैसे मागत असल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत सांगितले आहे. पैसे घेतलेल्या पोलिसाचे नाव माहित नाही. मात्र, त्याला आपण ओळखू शकतो, असे त्याने सांगितले आहे. शुक्ला याने पोलीस अधीक्षक यांच्याकडे केलेली तक्रार मागे घेण्यासाठी पोलीस दबाव टाकत असल्याचे दुकानदार मालकाने सांगितले आहे.