पोलीस कर्मचाऱ्याला कोरोना होतो तेव्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णालयाने दिला नकार  याचा वाईट अनुभव पोलीस कर्मचाऱ्याने सांगितला

पोलीस कर्मचाऱ्याला कोरोना होतो तेव्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णालयाने दिला नकार 


याचा वाईट अनुभव पोलीस कर्मचाऱ्याने सांगितला


 ठाणे-   ठाण्यातील एका पोलीस कर्मचारी कोरोना पोझीटीव्ह झाले होते. तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेले असता रुग्णालयाने नकार दिला. या घटनेचा 
वाईट अनुभव पोलीस कर्मचाऱ्याने सांगितला आहे.
 सतीश भानुदास ढगे पो.शि.क्र 081331 नेमणूक स.व सु. मुंबई येथे कार्यरत असून त्यांना एक आलेला मोठा अनुभव त्यांनी सांगितला आहे. खरच पोलीस असुन ही आपला काहीच ऊपयोग नाही ,कारण आपल्याच ब्रँचचे एक ASI काल रात्री कोरोना पाँजीटीव आले व त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी *फोर्टीज हाँस्पीटल वाशी* या ठीकाणी घेऊन गेले असता त्यांना अँडमीट तर करुन घेणे सोडा पण त्यांना कोणी विचारत पण नव्हत.(आपल्या पोलीस पँनलवर हे हाँस्पिटल असुन देखील) त्या वेळी आपले DCP प्रशांत कदम साहेब यांनी व सुर्यंवशी साहेबांनी मला रात्री 08:30वा फोन करुन त्या ठीकाणी जाण्यास सांगुन त्यांना तात्काळ अँडमिट करण्यास सांगीतले, त्यांच्या आदेशाप्रमाणे मि वाशी या ठिकाणी गेलो असता त्यांनी मला रुग्ण अँडमिट करनार नाही. कारण की हे कामोठे या ठीकाणचे असल्या करणाने त्याची म.न.पा.हद्द वेगळी पडते. त्याच दरम्यान माझ्याशी सतत संपर्कात आपले Dcp साहेब हे होते.त्यांनी मला स्थानीक पो.ठा वपोनिचा तसेच मनपाच्या काही अधिकारी याचे नंबर दिले. यातच रात्रीचे 11:00 वाजले पण काहीच हालचाल करत नव्हते मि आपल्या मुंबई पोलीस कोरोना हेल्पलाईन वर काँल करुन सर्व माहीती दिली.
कन्ट्रोल ने हाँस्पिटल शी बोलन करुन झाल्यावर त्यांनी अँडमीट करुन घेतो म्हणाले. आँनलाईन प्रोसेस पुर्ण झाल्यानंतर पेशंटला,चेक केल. आत घेण्यात आल.पण थोड्याच वेळात तेथील डाँक्टर शेट्टी यांनी आम्हाला सांगीतल की पेशंटला आम्ही येथे नाही ठेऊ शकत तुम्ही घेऊन जावा.आम्हाला आमच्या आधीकाऱ्यानी सांगीतल आहे.मि कारण विचारल तर ते कारण काहीच सांगत नव्हते.
पण आपले dcp सो हे सतत संपर्कात होते त्यांनी सर्व माहीती मला विचारुन वरिष्ठ पातळीवर प्रयत्न चालु केले आणी मला सांगीतले की आपण पेशंटला तिथेच अँडमिट करायच आणि हालचाली चालु केल्या 
  परत 11:45 च्या सुमारास हाँस्पिटल चा फोन आला की 2 लाख रु भरा तेव्हा पेशंट अँडमिट करु पण तो पर्यंत पणवेल म.न.पा आयुक्त व नवि मुबंई म.न.पा.आयुक्त यांनी व नवि मुबंई पोलीस आयुक्त यांची फोनवर बोलने झाले होते. जर अँडमिट करत नाहीत तर गुन्हा दाखल करा असे मा.नविमुबंई पोलीस आयुक्त व दोन्ही म.न.पा.आयुक्त यांनी आदेश दिले.स्थानिक पोलिस ठाण्याचे Api मोमीन मँडम यांनी त्या ठिकाणी येऊन सर्व काही हाँस्पिटल प्रशासनाला समजावुन सांगीतले. जर तुम्ही  पेशंट अँडमिट नाही करुन घेतला तर आम्हाला नाविलाजास्तव गुन्हा दाखल करावा लागेल.  हे सांगताच हाँस्पिटल वाले धावपळ करु लागले आणि शेवटी 20 हजार रु.भरुन रात्री 12:30 वा पेशंटला अँडमिट करुन घेतल.त्या वेळी त्यांच्या नातेवाईकाच्या डोळ्यात अश्रू आले होते पण ते क्रुतज्ञेचे होते. नातेवाईक सतत मला व Dcp  सो. यांना धन्यवाद देत होते. पण ते आपल्याच परीवारतील एक सदस्य होते मि त्यांना काळजी घेण्यास सांगितले आणि  घरी निघालो.
तो पर्यंत मला आपल्या ब्रँचचे गुंजाळ हे सतत फोन करुन विचारना करत होते.
सर्वात महत्वाच म्हणजे पोलीस असुन ही चार पाच तास ह्या हाँस्पिटल वाल्यानी वेठीस धरले यावरून सामान्य माणसाचे काय हाल होत असतील. पोलीस समाजाची सेवा करत असतानाही त्यांच्यावर अशी वेळ येणे म्हणजे ही वाईट बाब आहे. असे मत पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहेत.
 यात महत्वाच म्हणजे आपले Dcp  प्रशांत कदम साहेब (यांनी तर प्रत्येक पाच मिनिटांनी फोन करुन माहीती घेऊन दखल घेतली) तसेच मा नविमुबंई पोलीस आयुक्त, नविमुबंई मनपा आयुक्त, पनवेल मनपा आयुक्त. यांनी व स्थानिक पोलीस स्टेशन यांनी जी मदत केली.त्या बद्दल त्यांचे सर्वांनी आभार व्यक्त केले आहेत.


(एक गोष्ट लक्षात आली आपल पोलींसाच कोनच नसत बर का....)