नववीच्या विद्यार्थ्याने वडीलांचा मोबाईल हरवल्यामुळे थेट एसपींना लिहले पत्र
बीड : आजकला मोबाईल चोरी गेला तर परत मिळण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे साधी तक्राररी देण्याची तसदी कुणी घेत नाही. पंरतू आपल्या वडीलांचा हरवलेला मोबाईल परत मिळावा म्हणून एका नववीत शिकणार्या विद्यार्थ्याने थेट पोलीस अधीक्षक यांनाच पत्र लिहिले. या चिमुकल्याच्या पत्राची दखल दस्तरखुद्द पोलीस अधीक्षकांना घ्यावी लागली. त्यानं लिहीलेल्या दोन पानाच्या पत्राला यशही मिळालं. वडीलांचा मोबाईल परत मिळाला. तोही पोलीस अधीक्षकांनी स्वतः त्याच्यासोबत सेल्फी काढून आई-वडीलांच्या स्वाधीन केला.
शहरातील कालिकानगर मध्ये वास्तव्यास असणारे भीमराव सानप हे भाजीपाला खरेदीसाठी आल्यानंतर त्यांचा मोबाईल गहाळ झाला. एकदा हरवलेला मोबाईल परत मिळेल असं त्यांनाही वाटलं नव्हतं. पण त्यांचा नववीत शिकणारा मुलगा शुभमला हे माहित झालं. आणि त्यानं थेट पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना इंग्रजीतून पत्र लिहलं. पत्रामध्ये त्याने पोलीस अधीक्षकांना विनंती करत आपण मोबाईल शोधून द्याल अशीही अपेक्षा व्यक्त केली. पत्र पोलीस अधीक्षकांपर्यंत पोहचलं.. दोन दिवसात हा मोबाईल पोलीस अधीक्षकांनी शोधून काढला. गुरुवारी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी शुभमला तो फोन परत केला आणि त्याच फोनवर त्याच्याबरोबर सेल्फी व एक फोटो ही घेतला. शुभम यांनी पोलीस अधीक्षकांना सांगितले की, त्याला मोठे होऊन आयपीएस अधिकारी व्हायचं आहे.