हुंड्यासाठी विवाहितेचा छळ
बीड : आज कोरोना सारखे महाभयंकर संकट देशावर आले आहे. कधी काय होईल सांगता येत नाही. सर्वांना आपला जिव आणि आपल्या कुटूंबाचा जिव वाचवायचं पडलं आहे. पंरतू एवढ्या संकटसमयी चक्क पतीने राहिलेल्या हुंड्याचे पैसे घेवून ये म्हणत पत्नीला घराबाहेर काढले आहे. पैसे मिळाले तरच घरी ये नाहीतर घरी येवू नको अशीही धमकी दिली आहे. या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या लोकांमध्ये माणुसकी कधी जागी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तलवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत पीडित महिलेने म्हटले आहे की, पती व सासरची मंडळी यांनी तुझ्या आई व भावाकडून हुंड्याचे राहिलेले चार लाख रुपये घेवून ये असे म्हणत मारहाण केली. शिवीगाळ करत घरातून बाहेर हाकलले. या प्रकरणी पती संतोष कठाळू चव्हाण, सासरा कठाळू रंगनाथ चव्हाण व अन्य दोघे (सर्व रा.गणेशनगर ता.गेवराई) यांच्यावर तलवाडा पोलीस ठाण्यात कलम 498 (अ), 323, 504, 506, 34 भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार माने हे करत आहेत.