हॅव अ हर्ट फाउंडेशन कडून १२०० गरजूंना जीवनावश्यक वस्तूचे वाटप


हॅव अ हर्ट फाउंडेशन कडून १२०० गरजूंना जीवनावश्यक वस्तूचे वाटप
भाईंदर -  मीरा भाईंदर मधील हॅव अ हर्ट फाउंडेशनकडून लॉक डाऊन सुरू झाल्यापासून शहरात व इतर ठिकाणी अडकलेल्या १२०० गरीब व गरजवंतांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करत आहेत.
कोरोनाच्या महामारी मुळे शासनाने पूर्ण देशात लॉक डाऊन केले आहे. लॉक डाऊन सुरू असल्यामुळे गरीब मजूर, कामगार, प्रवाशी अनेक ठिकाणी अडकून पडले त्यांना खाण्यासाठी अन्न मिळेना अशा वेळी अनेक सामाजिक संस्था मदत करण्यासाठी पुढे आल्या. अशाच हॅव अ हर्ट फाउंडेशन या संस्थेने जे गरीब आहेत, रस्त्याच्या बाजूला, झोपडपट्टीत गोरगरीब आहेत, ज्यांचे पोट हातावर आहेत , ज्यांना काम केल्याशिवाय जेवण मिळणार नाही अशा नागरिकांना त्यांना जीवनावश्यक लागणाऱ्या वस्तूचे वाटप करत आहेत. लॉक डाऊन सुरू झाल्यापासून जवळपास १२०० कुटुंबांना वस्तूचे वाटप केले आहे. अखिलेश मिश्रा, मनीष मकवाना, अभिषेक मिश्रा, आशिष, सचिन, कृतीक, रुदरेश,शैलू , सुबोध , परेश हे दररोज गरजू नागरिकांना वस्तूचे वाटप करत आहेत. यांनी मिरारोड ते विक्रमगड पर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत. अशीच मदत लॉक डाऊन संपेपर्यंत करत राहणार असे संस्थेचे अध्यक्ष अखिलेश मिश्रा यांनी सांगितले. जर कोणी या गरीब गरजू नागरिकांना मदत करण्याच्या चांगल्या कार्यासाठी मदत करू इच्छित असाल तर आमच्याशी या  7400000547 नंबरवर  संपर्क करू शकता असे आवाहन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.