पैठण ते पंढरपूर ठेकेदाराच्या चुकीच्या नियोजनामुळे पाटोद्यातील नागरिकांना त्रास
पाटोदा - पाटोदा तालुक्यामध्ये पैठण ते पंढरपूर या रस्त्याचे काम चालू आहे परंतु ठेकेदाराच्या चुकीच्या नियोजनामुळे पाटोदा शहरातील नागरिकांना व व्यापाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नवीन एसटी स्टँड ते बाजार तळ हे बाजार पेठेतील मुख्य ठिकाण आहे. सध्या शासनाने लाॅकडाऊन मध्ये शासकीय कामाला परवानगी दिली आहे.छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नवीन पुलापर्यंत ठेकेदाराने रस्ता खोदून ठेवला आहे. पुढील कामाला मात्र गती दिसत नाही. येण्या जाण्यासाठी एसटी स्टँड समोरील लोकांना रस्ता नाही , काम करताना पाईप लाईन फुटल्यामुळे लोकांना पाणी मिळत नाही , आधीच लोक कोरोना रोगाने त्रस्त आहेत. ठेकेदाराने रस्ता खोदून ठेवला आहे पुढील काम बंद केले आहे. पावसाळा काही दिवसावर आला आहे हे काम पूर्ण झाले नाही तर येथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्यात आणखी वाढ होईल. आता या रस्त्याचे काम चालू झाले नाही तर पूर्ण पावसाळा काम करता येणार नाही. त्यामुळे काम सुरू करणे आवश्यक आहे. जर चार दिवसाच्या आत काम चालू केले नाही तर राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष गणेश कवडे हे जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहेत.
कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे एसटी स्टँड समोरील (पुर्वभागास) दवाखाने,मेडिकल, किराणा,चे अनेक दुकाने व मोठी सोसायटी आहे .पैठण ते पंढरपूर रस्त्याच्या कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे सर्वकाही विस्कळीत झाले आहे, माझ्या दवाखान्यासमोर कबंरी येवडे पाणी आहे व गाळ असल्यामुळे व्यापारपेठ विस्कळीत झाली आहे, लोकांना दुकानात, व दवाखान्यात जाण्यासाठी रस्ता नाही.पाण्याची पाईप लाईन फुटल्याने लोकांना पाणी नाही.यासाठी शासशाने व कंत्राटदाराने तत्काळ दखल घ्यावी अशी मागणी डाॅ.लक्ष्मणराव जाधव यांनी केली आहे.