पो नि . सिध्दार्थ माने यांना मातृशोक
पाटोदा : पाटोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिध्दार्थ माने यांच्या मातोश्री चंद्रभागाबाई जळबाजी माने ( वय ७८ ) यांचे पक्षघाताने परभणी येथे रोजी निधन झाले . चंद्रभागाबाई यांनी मोठे कष्ट सोसुन आपल्या दोन्ही मुलांस पोलीस दलाच्या सेवेत दाखल केले . एक मुलगा पोलीस निरीक्षक पदावरुन सेवानिवृत होऊन निधन झाले . तर सिद्धार्थ माने हे पाटोदा येथे आहेत . कोरोनाच्या संचारबंदीत माने कर्तव्यावर अडकले . चंद्रभागाबाई यांना पक्षघाताचा झटका आला होता . संचारबंदीमुळे मुलाची व आईची भेटही झाली नाही . त्यातच त्यांचे परभणी येथिल खाजगी दवाखान्यात निधन झाले . त्यावेळी सिध्दार्थ माने हे सौताडा चेकपोस्टवर बंदोबस्तावर होते . चंद्रभागा माने यांच्या पश्चात पती जळबाजी , मुलगा सिध्दार्थ माने , डॉक्टर व प्राध्यापक व इंजिनिअर नातवंडे असा परिवार आहे . माने परिवाराच्या दुःखात दैनिक शिवमावळा परिवार सहभागी आहे .