कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या इमारतीकडे मनपाचे दुर्लक्ष


मिरारोड - मिरा भाईंदर महानगरपालिका परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पालिका परिसरात एखाद्या इमारतीत रुग्ण आढळून येतो त्या इमारतीकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.  मीरा-भाईंदर परिसरात गेल्या काही दिवसापासून रुग्ण संख्येत वाढ होत आहे.शहरातील अनेक भागात कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर त्या इमारत किंवा गल्लीमध्ये फलक लावले जाते. व त्यांना माहिती दिली जाते त्या परिसरातील रहिवाशांना लागणारे सुविधा,  समस्यांचे निराकरण करण्यासाठी पालिका अधिकारी , आरोग्य अधिकारी, कर्मचारी, पोलिस अधिकारी यांची नियुक्ती केली जाते. व परिसर कंटेनमेंट झोन म्हणून 14 दिवसांसाठी घोषित केला जातो.  परंतु ही यादी फक्त नावापुरतीच असते का असे रहिवाशी विचारत आहेत. काशीगाव येथील ग्रीन व्हिलेजच्या बाजूला हॅम्लेट टॉवर या  इमारतीमध्ये 21 मे रोजी कोरोनाचे 2 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. इमारतीबाहेर फलक लावला आहे. त्यावर 22/ 5/ 2020 ते  4/ 5/  2020 अशी चुकीची तारीख टाकलेली आहे. या इमारतीबाहेर फक्त नावापुरते फलक लावून गेले की काय ?  तेथील रहिवासी यांना माहिती देण्यासाठी किंवा त्यांची विचारपूस ,  चौकशी करण्यासाठी पालिका प्रशासनाचा कोणताही अधिकारी व कर्मचारी आलेला नाही या इमारतीमधील काही रहिवाशांनी पालिकेचे आरोग्य अधिकारी व इतर काहींना अनेक वेळा फोन केला परंतु त्यांचा फोन उचलण्यात आला नाही त्यामुळे तेथील रहिवासी गोंधळून गेले होते.  तसेच त्यांनी कोणत्या प्रकारे खबरदारी घेतली पाहिजे याची कोणतीही व्यवस्था केलेली दिसून येत नाही असे तेथील रहिवाशांनी सांगितले आहे. पालिका प्रशासनाकडून अशाप्रकारे दुर्लक्ष केले जात  असेल तर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न होता आणखी वाढू शकतो अशी शंका उपस्थित केली जात आहे.