पाटोदा आरोग्य विभागाचा अभिनव उपक्रम  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व पोलीस व पत्रकारांची केली मोफत आरोग्य तपासणी

पाटोदा आरोग्य विभागाचा अभिनव उपक्रम


 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व पोलीस व पत्रकारांची केली मोफत आरोग्य तपासणी



पाटोदा -  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २४ तास बंदोबस्तावर असणारे पोलीस कर्मचारी व पत्रकारांची आरोग्य तपासणी महाराष्ट्र दिना निमित्त पाटोदा आरोग्य विभाग मार्फत  हा उपक्रम राबविण्यात आला.कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन कठोरपणे उपाय योजना करत आहे. यासाठी पोलीस कर्मचारी २४ तास सेवेत असतात. यावेळी त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी पाटोदा पोलीस स्टेशनचे सर्व पोलिस व आपल्या जिवाची परवा न करता आपल्या लेखणीतून सर्वांना न्याय देण्यासाठी लढणारे पञकार यांची आरोग्य तपासणी करत रक्त तपासणी करण्यात आली या अभिनव उपक्रमाची सुरूवात पाटोदा पोलिस स्टेशनचे एपीआय कोळेकर , आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. एल.आर.तांदळे, डॉ. मयूर शिंदे ग्रामीण रुग्णालयाचे डाॕ.मुंडे,पञकार संघाचे अध्यक्ष सोमिनाथ कोल्हे,मराठी पञकार संघाचे जिल्हाउपाध्यक्ष पोपट कोल्हे,पञकार गणेश शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थित झाली. शिबिर यशस्वी होण्यासाठी पाटोदा आरोग्य विभागाचे देशमुख आर.एच, नागरगोजे एस.एन,घोडके आर.आर, तुकाराम मिसाळ,वैभव येवले, हनुमंत खाडे,सुनिल राख,काळे,शिंदे आरोग्य सेवक,बोबडे आरोग्य सेवक यांच्या सह सर्व पाटोदा आरोग्य विभागातील कर्मचारी यांनी केले.