पंकजाताईंना भाजपने उमेदवारी नाकारली 

पंकजाताईंना भाजपने उमेदवारी नाकारली


बीड: पंकजाताई मुंडे यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याची माहिती मिळत आहे. विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपने तीन जागांसाठी मुंडे, खडसे, बावनकुळे या तिघांनाही डावलून गोपीचंद पडळकर, विजयसिंह मोहिते पाटील या नावावर जवळपास शिक्कामोर्तब केले आहे. तर तिसर्‍या जागेसाठी डॉ.गोपचडे आणि प्रविण दाटके यांच्या नावाबाबत चर्चा सुरु आहे. पक्षातील जुन्या कुणालाच संधी नाही हा एकमेव निकष यासाठी लावण्यात आल्याची माहिती आहे. 
माजी ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांना आपल्याला उमेदवारी मिळेलच याविषयी 200 टक्के खात्री होती. त्यासाठी त्यांनी राज्यातील प्रत्येक शासकीय विश्रामगृहाकडून आपल्याकडे थकीत बाकी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र मिळवले होते. तसे पत्रच व्हायरल झाले होते.  मात्र मुंडेंपेक्षा  गोपीचंद पडळकर हे भाजपला सर्वात जवळचे वाटले. ते धनगर समाजातून येतात. पश्चिम महाराष्ट्रातील धनगर समाजाचं प्राबल्य पाहून आणि भविष्यकाळात पवारांच्या राजकारणाचा विचार करून भाजपने पडळकरांना ताकद देण्याचे सुत्र अवलंबिले आहे. एका ओबीसीचे तिकिट कापून दुसर्‍या ओबीसीलाच त्यांनी तिकिट देऊन पंकजाताई समर्थकांचीच गोची केली आहे.