संवेदनशील पत्रकारांच्या पाठपुराव्यामुळे पाटोदा येथिल पैठण-पंढरपुर राज्यमार्गाचे बंद पडलेले काम सुरू
आ.बाळासाहेब आजबे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आठ दिवसांत काम पूर्ण करण्याचे आदेश
पाटोदा - पाटोदा बाजारपेठेतील पैठण ते पंढरपूर राज्यमार्गाचे आठ दिवसांपूर्वी खोदकाम करुन गुत्तेदारांच्या अंतर्गत राजकारणामुळे बंद पडले होते, ११ मे रोजी न्युज सेव्हन डेज चे बीड जिल्हा प्रतिनिधी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर व राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष गणेश कवडे यांनी आठ दिवसांत काम पूर्ण झाले नाहीतर आंदोलनाचा इशारा दिला होता, याचवेळी डॉ.लक्ष्मण जाधव , परीवार हास्पिटल यांनी झालेले खोदकाम व त्यात कमरे इतके अवकाळी पावसामुळे साचलेले दुषित पाणी , त्यामुळे अबालवृद्ध यांना दवाखान्यात येण्यासाठी होणारा त्रास आणि कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर दुषित पाण्याचा वापर झाल्यास वाढणारे साथीचे आजार याविषयी चिंता व्यक्त केली होती,याचवेळी गुरुकृपा मेडिकल चे मालक अरूण पवार यांनी रूग्णांना होणारी अडचण याच बरोबर कापडाचे व्यापारी अविनाश जाधव यांनी व्यवसायांसाठी येणा-या अडचणींचा पाढा वाचत लवकरात लवकर रस्ताकाम पुर्ण करावे अशी प्रशासनाला विनंती केली होती, या प्रकरणी ऋषिकेश विघ्ने संपादक व वार्ताहर राहुल शेवाळे यांनी साप्ताहिक आठवडा विशेष आणि संपादक शेख अजीज यांच्या जय हिंद महाराष्ट्र या न्यूज पोर्टल व्दारे पाटोदाकरांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता.डा.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी या प्रकरणी पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी , रस्ते,वाहतुक केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री उदधवजी ठाकरे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ , सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड धनंजयजी मुंडे, पाटोदा-आष्टी-शिरुर मतदारसंघाचे विधानसभा सदस्य आ.बाळासाहेब आजबेकाका , विधानपरिषद सदस्य आ.सुरेश आण्णा धस यांना लेखी निवेदन ई-मेलद्वारे पाठवले होते. १३ मे रोजी आष्टी -पाटोदा- शिरूर विधानसभेचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबेकाका यांनी पैठण ते पंढरपूर राज्यमार्ग बसस्थानक परिसरात प्रत्यक्ष भेट देऊन आठ दिवसापासून केवळ खोदकाम करुन बंद पडलेले रस्त्याचे काम पाहुन संबंधित गुत्तेदार तिरुपती कन्स्ट्रक्शनचे मालक केशव आघाव यांच्याशी बातचीत करुन रस्ताकाम सुरू करुन दहा दिवसाच्या आत काम पुर्ण करण्याचे आदेश दिले.त्यानंतर लगेचच रस्ता कामाला सुरुवात झाली.
आ.आजबेकाका हे स्वत: पाहणी करण्यासाठी आल्यामुळे आणि डॉ.जाधव तसेच व्यापारी , नागरीकांच्या अडचणी समजावून घेऊन गुत्तेदाराला तात्काळ काम सुरू करण्याचे आदेश दिल्यामुळे समाधानी नागरीकांनी आ.बाळासाहेब आजबे यांचे आभार मानले.