मुस्लिम समाजाने रमजान ईद साठी नवीन कपडे खरेदी करने टाळावे -
सय्यद अन्सार
पाटोदा - मुस्लिम समाजाने रमजान ईद साठी नवीन कपडे खरेदी न करता त्याबदल्यात गरीब व गरजू नागरिकांना मदत करावी असे आवाहन
समाजसेवाक सय्यद अन्सार यांनी केले आहे.
कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने योग्य वेळी योग्य निर्णय घेतलेला असुन यामुळे राज्यामध्ये आज आपण थोडेसे सुरक्षित आहोत याच पार्श्वभूमीवर आपण देखील योग्य निर्णय घेण्याची भुमिका पार पाडावी लागणार आहे याचे सर्वांनी भान ठेवले पाहिजे. भारतातच नव्हे तर जगात करोना सारख्या माहामारीने थैमान घातलेला असल्याने मुस्लिम समाजाने ईद साठी नवीन कपडे खरिदी करने टाळावे व गरीब लोकांना त्या पैश्यांची मदत करावी नक्कीच त्याठिकाणी आपल्या कडुन "फुल ना फुलाची पाकळी" म्हणून लोकांना मदत होईल. पवित्र रमजान ईदच्या निमित्त आपण दरवर्षी नवीन कपडे खरेदी करतो वेगवेगळ्या वस्तू खरेदी करतो परंतु या वर्षी असं काहीच न करता आपले शेजारी पाजारी किंवा गरीब नातेवाईक यांना अन्न धान्य द्या त्यामुळे त्या लोकांना तुमच्या कडुन मदत होईल व त्यांच्या घरात देखील सन साजरा होईल. कोरोना सारख्या आपत्तीला आपल्याला मात करायची असेल तर आपण बाहेर न पडता, गर्दी न करता ,सोशल डिस्टन्स ठेवून आपल्या मुलभुत गरजांची खरेदी केली तरी चालेल परंतु विनाकारण घराच्या बाहेर न पडता आपला जिल्हा आपण सुरक्षित ठेवू शकतो. म्हणून माझी संपूर्ण बीड जल्ह्यातील मुस्लिम बांधवांना नम्रतेची विनंती आहे की आपण शक्यतो आपल्या घरच्या महिलांना घराबाहेर जाण्यासाठी थांबवावे. "घरी राहु,सुरक्षित राहू" असे आपण निर्धार करू.