बुध्द जयंती व शाहू महाराजाचा स्मृतीदिन साजरा


बुध्द जयंती व शाहू महाराजाचा स्मृतीदिन साजरा



परभणी - शहरातील विवेकानंद नगर,जुना पेडगांव रोड येथील चक्रवर्ती राजा सम्राट अशोक बुध्द विहारामध्ये मोठ्या उत्साहात भगवान बुद्ध यांची 2564 वी जयंती आणि लोकराजा राजर्षी शाहु महाराज यांचा स्मृतीदिन लाँकडाऊन च्या सर्व नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला.
प्रांरभी महामानवाच्या प्रतिमाचे पुजन करण्यात आले. सामुहिक त्रिरत्न वंदना घेण्यात आली.
प्रबोधनकार शिवाजी कांबळे व त्यांच्या संचानी तथागत बुध्द,शाहु महाराज यांच्या जिवन कार्यावर गीत सादर करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष मा.सायस मोडक,महासचिव प्रा.बी.आर.बनसोडे,बौध्दाचार्य भानुदास साबळे काका उपस्थित होते. प्रास्ताविक संभाजी गायकवाड यांनी तर संचलन आदित्य कांबळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी ऍड. अशोक अंभोरे,शांतीपाल साबळे, गंगाधर क्षीरसागर,  भीमराव साळवे,हाणवते, बाबासाहेब कांबळे, आशाताई साबळे, ललिता कांबळे,कुंडलीक अंभोरे, सुलोचना साबळे गयाबाई हजारे, अन्नपुर्णा लाटे, मंगल मस्के यांचे सहकार्य लाभले. शेवटी खीरदान व भोजनदान करण्यात आले. शेवटी इंजि अरविंद कांबळे यांनी सर्वाचे आभार मानले.