कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आ. बाळासाहेब आजबे यांची पाटोदा तहसीलमध्ये आढावा बैठक
बंद हायवचे काम तात्काळ चालू
पाटोदा - कोरोना सारख्या महाभयंकर आजारामुळे संपूर्ण जग संकटात असताना आष्टी मतदारसंघातील चांगल्या प्रशासनाच्या निर्णयामुळे तर लोकप्रतिनिधीच्या उत्तम नियोजनामुळे मतदारसंघातील जनतेला आतापर्यंत त्रास झाला नाही यामुळे सामान्य लोक जरी कोरोना बाबत गंभीरता घेत नसले तरी आष्टी मतदारसंघातील प्रशासन व लोकप्रतिनिधी गंभीर आहेत यामुळे १३ मे रोजी आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी पाटोदा तहसील मध्ये तालुक्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीन तास आढावा बैठक घेऊन विविध विषयावर चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांना बी बियाणे घेण्यास कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, शेतकऱ्यांची लूट होऊ नये म्हणून कृषी दुकानदारांनी दुकानाच्या बाहेर भाव फलक लावावे तर कोणताही कृषी दुकानदार अधिक भावाने बी बियाणे विकत असेल तर त्यांच्यावर कारवाई करा. कृषी सेवकांनी गावागावात जाऊन शेतकऱ्यांना बी बियाणे ची माहिती द्यावी अशा सूचना कृषी विभागाला केल्या तर महावितरणने विद्युत तारा खाली आल्यामुळे पावसाळ्यात दुर्घटना होऊ नये म्हणून पावसाळ्यापूर्वीच सर्व व तांत्रिक अडचणीचे कामे तात्काळ करून घ्यावेत. ज्या गावातील डीपीचे प्रॉब्लेम असतील त्या गावातील सर्वे करून सर्व डीपी तात्काळ बदलून देणे यामुळे शेतकऱ्यांना पुढे अडचणीचा सामना करावा लागणार नाही तर आरोग्य विभागाने आतापर्यंत खूप छान काम केले आहे व आता शहरी भागातून जास्त लोक येऊ लागल्यामुळे आपल्या तालुक्यातील आरोग्य विभागाला गालबोट लागू नये म्हणून पहिल्या पेक्षा जास्त लक्ष देण्याची गरज आहे. सामान्य लोकांना व तुमच्या विभागाला कसल्याही प्रकारची अडचण आल्यास तात्काळ मला फोन करा मी सहकार्य करेल तसेच पोलीस प्रशासनाने आतापर्यंत खूप छान काम केले आहे मात्र आता रात्र वैऱ्याची असल्यामुळे इथून पुढेही पोलीस प्रशासनाने खूप जागरूक रहाणे काळाची गरज आहे व आपले पोलिस प्रशासन चांगले काम करील यांची मला खात्री असून पुरवठा विभागाचा आढावा घेताना गोरगरीब नागरिकांसाठी आलेल्या धान्यात काळा बाजार झालातर खपवून घेतले जाणार नाही असे पुरवठा अधिकाऱ्यांना सुचवले. पाटोदा तालुक्यातील अतिशय गंभीर विषय असलेला पाटोदा शहरातून जात असलेल्या पैठण पंढरपूर हायवेचे काम काही दिवसांपासून बंद असल्यामुळे शहरातील व्यापारी व नागरिकांना खूप त्रास होत होता यामुळे राष्ट्रीय कॉग्रेस तालुकाध्यक्ष गणेश कवडे व सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी आवाज उठवल्यामुळे ही गोष्ट वर्तमान पत्राच्या माध्यमातून आष्टी मतदार संघाचे दबंग आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या कानावर गेल्यानंतर तात्काळ आजबे यांनी गुत्तेदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन त्यांच्या अडचणीची विचारपूस करून रस्त्याचे बंद काम पडलेल्या ठिकाणी जाऊन तेथील अडचणी सोडत तात्काळ शहरातून जात असलेल्या पैठण पंढरपूर हायवेचे काम चालू करायला लावले. यामुळे भयभीत अवस्थेत असलेल्या शहरातील व्यापारी व नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आणी तालुक्यामध्ये चांगल्या कार्याची चर्चा होत आहे.