ऑडिओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

ऑडिओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन


बीड : सद्यस्थितीत कोरोना विषाणूने संपूर्ण जगभर थैमान घातले आहे . त्यामुळे याला प्रतिबंध घालण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली आहेत . त्यासाठीच ' लॉक डाऊन ' सुरु आहे . त्यामुळे शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन अशक्य आहे . त्यामुळेच रिलायन्स फाउंडेशन व  कृषी विज्ञान केंद्र दिघोळआंबा येथील शास्त्रज्ञांनी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन सुरु केले आहे . यासाठी डिजिटल टेक्नॉलॉजि मध्ये ऑडिओ कॉन्फरन्सचा आधार घेतला जात आहे . या खरीप हंगामा करता शास्त्रोक्त शिफारशीत तंत्रज्ञानावर आधारित कमी खर्चाच्या निविष्ठांची निवड करून तसेच शिफारशीत कमी खर्चाचे तंत्रज्ञान अंगीकारून शेतकरी बंधूनी निव्वळ नफा वाढवावा , हा उद्देश समोर ठेवून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी रिलायन्स फाउंडेशन व कृषि विज्ञान केंद्र वाशिम यांनी संयुक्तरित्या शेतकऱ्यांसाठी ' ऑडिओ कॉन्फरन्स ' चे आयोजन केले . त्यात महिनाभरावर असलेल्या खरीप हंगामात बियाण्याची , जातीची निवड , बियाण्याला बीज प्रक्रिया तसेच फळबागेचे नियोजन, भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन याविषयी विज्ञान केंद्र , दिघोळआंबा येथील उद्यानविद्या शास्त्रज्ञ नरेंद्र जोशी तसेच  सुहास पंके यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक मनोज काळे व कार्यक्रम सहाय्यक विजय खंडागळे यांनी केले.