मंडळाकडून परिसरात औषध फवारणी
मिरारोड : कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनासह सर्वच काळजी घेत आहेत. संसर्ग वाढू नये यासाठीच पेनकरपाडा येथील सामाजिक मंडळाच्या वतीने छोटया छोटया गल्ल्यामध्ये निर्जंतुकिकरण केले जात आहे.
मिरा भाईंदर महापालिकेच्या मार्फत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी शहरात विविध ठिकाणी अग्निशमन दलामार्फत निर्जंतुकीकरण केले जात आहे . मात्र काही काही ठिकाणी चिंचोळ्या गल्ल्या असल्यामुळे त्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करता येत नाही. अशा ठिकाणी पेणकरपाड्यातील निरबादेवी युवा मित्र मंडळातील तरुणांनी एकत्र येऊन गावाच्या सुरक्षेसाठी सोडियम हायड्रोक्लोराइड औषधाचा वापर करून परिसर निर्जंतुकीकरण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे .दररोज मंडळातील तरुण एकत्र येत परिसर निर्जंतुकीकरण करत असल्याने परिसरातील नागरिकांकडून त्यांच्या कामाचे कौतुक केले जात आहे. त्यामुळे परिसरातील तरुणांची कोरोना विषयीची जागरूकता पाहून इतर नागरिकही काळजी घेताना दिसत आहेत.