संभाजीनगर मध्ये एकाच दिवसात 90 रुग्णांची वाढ,  आतापर्यंत 468 कोरोनाबाधित

संभाजीनगर मध्ये एकाच दिवसात 90 रुग्णांची वाढ, 
आतापर्यंत 468 कोरोनाबाधित


 संभाजीनगर- राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यात रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. त्याचपैकी संभाजीनगर (औरंगाबाद ) जिल्ह्यात एकाच दिवसांत 90 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने खळबळ उडाली आहे.आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित  रुग्णांचा आकडा 468 वर पोहोचला आहे.
   संभाजीनगर जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात कोरोनाच्या रुग्णसंख्येत कमी प्रमाणात वाढ होत होती. परंतु गेल्या आठ दिवसापासून यामध्ये मोठ्या झपाट्याने वाढ होत होती. गेल्या आठ ते दहा दिवसांत 50 रुग्णांचा आकडा 468 वर पोहोचला आहे. नियमाची अंमलबजावणी कठोर पणे करूनही रुग्ण संख्या वाढत असेल तर प्रशासन हे कुठेतरी कमी पडत असल्याचे दिसून येते. प्रशासनाबरोबरच शहरातील प्रत्येक नागरिकांची आपापली सुरक्षा घेण्याची जबाबदारी मोठी आहे. परंतु नागरिक हे योग्य रित्या जबाबदारी घेत नसल्याने कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे.नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी व घरातच बसून राहावे असे प्रशासनाकडून वारंवार सांगितले जात असतानाही नियम पाळले जात नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.
एक दिवसांत शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा पुढीलप्रमाणे एसआरपीएफ कॅम्प (72) जयभीम नगर (04), बेगमपुरा (04), भीमनगर, भावसिंगपुरा (01), शाह बाजार (01),  ध्यान नगर, गारखेडा (01),  एन-2 लघु वदन कॉलनी, मुकुंदवाडी (01), बायजीपुरा (03), कटकट गेट (01), सिकंदर पार्क (01) आहेत. तर ग्रामीण भागातील खुलताबाद (01) येथील आहेत. यामध्ये 83 पुरूष आणि सात महिला रुग्णांचा समावेश असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने  सांगण्यात आले.