संभाजी मुंडे हल्ला प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे धनंजय मुंडे यांचे परळी पोलिसांना निर्देश
बीड :- परळी वैजनाथ येथील पत्रकार संभाजी मुंडे हल्ला प्रकरणातील आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पोलीसांना दिले आहेत.
परळी शहरात घडलेल्या या हल्ल्याच्या घटनेची धनंजय मुंडे यांनी तातडीने माहिती घेऊन हा हल्ला कोणत्याही कारणावरून झाला असला आणि आरोपी कोणीही असले तरी त्यांचा मुलाहिजा न बाळगता त्यांना तातडीने अटक करा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करा असे निर्देश दिले आहेत. शहरात कोणत्याही प्रकारची आणि कोणाचीही गुंडगिरी चालू दिली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. याबाबत पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे.