कोरोनाचा फटका , मिरची उत्पादकावर खर्च निघणे झाले अवघड

कोरोनाचा फटका , मिरची उत्पादकावर खर्च निघणे झाले अवघड
पाटोदा -  सतत शेतकऱ्यांच्या नशिबी आधी दुष्काळ आणि सावकारांच दुष्टचक्र असायचे. आता हे कमी म्हणून की काय कोरोनाने शेतकरी वर्ग कोलमडून पडला असून पाटोदा तालुक्यातील जवळाला  येथील शेतकरी लक्ष्मण गिज्ञादेव जाधव यांना मिरची उत्पादनावरील खर्च ही निघणे अवघड झाले आहे असे त्यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. पोटाच्या गोळ्याप्रमाणे जपलेले मिरचीचे पीक ऐन बहरुन बाजारपेठेत विक्रीसाठी नेण्याची वेळ येताच कोरोनामुळे फटका  शेतकऱ्यांना फटका बसने सुरू झाले. लक्ष्मण जाधव यांनी आपल्या शेतात शेततळ्याच्या माध्यमातून कमी पाण्यावर ठिबकद्वारे मलचिंग पेपरवरुन मिरचीचे पीक पीकवले मिरची चांगली आली मात्र कोरोनामुळे बाजारपेठ बंद आहे व लाॅकडाऊन असल्याने व्यापाऱ्यांकडुन कवडीमोल दराने मागितले जात असल्याने यातून उत्पन्न तर लांबच उत्पन्नावरील केलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे. जाधव यांनी शेततळ्यावर तीन लाख वीस हजार ,व मिरची लागवडीवर पंचावन्न हजारांचा खर्च केला असून यातून मिळणारे उत्पन्न अगदी कवडीमोल असल्याने सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक आधार दयावा असे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.