मजुरांच्या खिचडी वाटप मध्ये भ्रष्टाचार झाल्याची शहरभर चर्चा
मिरारोड - कोरोनाच्या महामारी मुळे पूर्ण देशावर संकट आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी शासनाने लॉक डाऊन घोषित केला. लॉक डाऊन मुळे मजूर, कामगार, गरीब नागरिकांचे अतोनात हाल झाले. पूर्ण बंद झाल्यामुळे श्रमिक, मजुर व कामगार यांना मदत व्हावी यासाठी शासनाने खिचडी वाटप सुरू केले. परंतु या खिचडी वाटपामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची शहरभर चर्चा सुरू झाली आहे.
मीरा भाईंदर महानगर पालिका क्षेत्रात गरीब , मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात राहत आहे. लॉक डाऊन झाल्यामुळे गरिबांना एक वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता. यासाठी शासनाने त्यांना जेवण म्हणजेच खिचडी उपलब्ध करून दिली. ही खिचडी वाटप करण्यासाठी अनेक संस्थांना काम दिले. त्याला कम्युनिटी किचन असे नाव दिले. या कम्युनिटी किचन मधून ह्या संस्था खिचडी वाटप करत होत्या. सुरुवातीला तर या संस्था असे दाखवत होत्या की आम्ही आमच्या पैशाने गरिबांना मदत करत आहेत. नागरिकांनी त्याचे आभार मानले. परंतु या खिचडी वाटप मध्ये मोठा झोल झाल्याची काही दिवसापासून शहरभर चर्चा सुरू आहे. एका कागदावर काही संस्थांचे नाव व त्यापुढेे त्यांना खिचडी वाटपासाठी दिलेली रक्कम दाखवण्यात आली आहेे हे पत्रक सोशल मीडियावर फिरत आहे. गरिबांना वाटन्यात येणारी खिचडी नक्की कोणी कोणी खाल्ली आहे हे लवकरच उघडकीस येईल.