मीरा भाईंदर काँग्रेस तर्फे काशी मीरा महामार्गावर 24 तास वाटप व मदत केंद्र

मीरा भाईंदर काँग्रेस तर्फे काशी मीरा महामार्गावर 24 तास वाटप व मदत केंद्र


मिरारोड - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्या मार्गदर्शनाखाली मीरा भाईंदर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने परराज्यात पायी चालत चाललेल्या गोर गरीब, कामगार,कष्टकरी,मजुरांसाठी ए. जी. नगर काशीमिरा येथे  24 तास मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी प्रत्येकाला पाणी बॉटल, बिस्कीट, स्नॅक्स पॅकेट, ORS पॅकेट चे वाटप केले जात असून 120 तास झाले असून आतापर्यंत 45,000 लोकांना त्याचे वाटप झाल्याचे कार्याध्यक्ष प्रमोद सामंत यांनी सांगितले. काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची टीम तयार करण्यात आली असून दर 4 तासांनी दुसऱ्या टिमकडे चार्ज देतात, पक्षाचे नगरसेवक ही या केंद्रावर  सेवा देत असून सदर वाटप व मदत केंद्र  अविरतपणे 24/7  सुरू रहाणार आहे. काँग्रेसच्या वतीने संकटाच्या वेळी मदत मिळाल्याने पायी जाणाऱ्या नागरिकांनी आभार मानले आहे.