बीड शहरात मान्सून पूर्व स्वच्छता मोहीमेला सुरुवात , स्वच्छतेची यंत्रणा घेऊन उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर

बीड शहरात मान्सून पूर्व स्वच्छता मोहीमेला सुरुवात 


स्वच्छतेची यंत्रणा घेऊन उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर रस्त्यावर 


बीड - शहरात मान्सून पूर्व स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून स्वच्छता विभागाची यंत्रणा घेऊन उपनगराध्यक्ष तथा स्वच्छता सभापती हेमंत क्षीरसागर रस्त्यावर उतरले आहेत, यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे उपस्थित होते. नगर परिषदेच्या वतीने शहरातील मोंढा रोड,सटवाई मैदान परिसर, सुभाष रोड येथील मुख्य नाल्यांची मान्सूनपूर्व तयारी म्हणून नाले-सफाईची कामे सुरू केली आहेत. तसेच शहरातील उर्वरित सर्व मोठ्या नाल्यांच्या सफाईचे काम देखील लवकरच पूर्णत्वास नेले जाणार आहेत. गुरूवार पासून बीड शहरात मान्सून पूर्व स्वछता मोहीम सुरू करण्यात आली आहे. उपनगराध्यक्ष तथा स्वच्छता सभापती हेमंत क्षीरसागर ,मुख्याधिकारी डॉ उत्कर्ष गुट्टे हे रस्त्यावर उतरले आहेत.  मान्सून पूर्व स्वच्छता मोहीम राबवत शहरातील  मोठे नाले व त्याचा परिसर स्वच्छ केला जाणार आहे. शहरात टप्या टप्यात ही मोहीम राबविली जाणार आहे.