सावली फाउंडेशन च्या माध्यमातून दिपक गर्जे यांनी गरीब कुटुंबांना किराणा वाटप करून सावली देण्याचे काम
पाटोदा -: सावली फाउंडेशन च्या माध्यमातून आज सावली फाउंडेशन चे दिपक गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटोदा तालुक्यातील सावरगाव (सोने) याठिकाणी अनेक गरजू गरीब कुटुंबांना किराणा साहित्य देऊन खर्या अर्थाने माणुसकीचा आधार देण्यात आला आहे. आज कोरोना मुळे अनेक लोकांना मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांना रोजगार नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्या गरीब लोकांच्या मदतीला सावली फाऊंडेशन धावून आली आहे. कुसळम या ठिकाणी देखील पालावरील गरीब लोकांना मदत करण्यात आलेली आहे .समाजामध्ये दिपक गर्जे सारख्या तरूणाने सावली फाउंडेशन च्या माध्यमातून आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवून गरजू गरीब वंचित घटकांना आधार देण्याचे काम केले आहे. दानशूर लोकांच्या मदतीने सावली फाऊंडेशन चे दिपक गर्जे प्रामाणिकपणे व खऱ्या गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचण्याचे कार्य करत असून त्यांच्या कार्याची सर्व स्तरातून कौतुक होत आहे. महासांगवी या गावचे रहिवासी दिपक गर्जे असून बीड या ठिकाणी स्वतः एचडीएफसी बँकेत नोकरी करत असतानादेखील सामाजिक काम करण्याच्या आवडीमुळे व गरीबांची होणारी होरपळ थांबवण्यासाठी सावली फाउंडेशन च्या माध्यमातून अनेक गरजू गरिबांना सावली देण्याचे काम करत आहेत. आत्तापर्यंत जवळपास १०० कुटुंबांना एक महिना पुरेल असे किराणा साहित्य वाटप केले आहे. व त्यांचा १००० कुटुंबांना किराणा देण्याचा मानस आहे. दानशूर व्यक्तींनी दीपक गर्जे यांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क -: ९९२३९९१९२७
सावली फाउंडेशन च्या माध्यमातून दिपक गर्जे यांनी गरीब कुटुंबांना किराणा वाटप करून सावली देण्याचे काम