प्रविण देशमुख यांच्याकडून गरीब, गरजू कुटुंबांना मदत
ईट - प्रविण भैया देशमुख यांनी गरजूना किराणा साहित्याचे आज घरपोंच वाटप केले. ऐन संकटकाळात नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लाॅकडाऊन आहे, हातावर पोट असणारे, रोजंदारी, कष्टकरी कामगार व गोरगरीब जनता यामुळे मोठ्या अडचणीत सापडली आहे, त्यांचा रोजगार बंद झाला आहे. अशा कठीण प्रसंगात ईट चे माजी उपसरपंच प्रविण देशमुख यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. प्रविण देशमुख यांनी केलेल्या या मदतीबद्दल कष्टकरी व मोलमजुरी करणाऱ्या घटकांनी समाधान व्यक्त केले असून घरपोंच किराना मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.घरपोच मदत पोहोच करण्यासाठी त्यांचे सहकारी ईश्वर देशमुख , कामिल काझी , बंटी देशमुख , आप्पासाहेब चव्हाण, वैभव देशमुख, अक्षय देशमुख , आकाश देशमुख,अशोक माने, शेखर देशमुख ,युवराज थोरात आदींनी सहकार्य केले.
प्रविण देशमुख यांच्याकडून गरीब, गरजू कुटुंबांना मदत