मीरा भाईंदरमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ
आतापर्यंत १५ जणांना लागण
भाईंदर - मिरा भाईंदरमध्ये दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. शहरात आतापर्यंत १५ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली आहे. चार दिवसांपूर्वी शहरात एकही कोरोना बाधित नव्हता. परंतु चार दिवसातच ही वाढत आहे. कालपर्यंत ही संख्या ८ होती. रविवारी एका दिवसात ७ रुग्णांमध्ये भर पडून आता १५ रुग्ण झाले आहेत.
मिरा भाईंदरमध्ये आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी सुरुवातीपासूनच कोरोनाविषयी काळजी पूर्वक लक्ष देऊन जनजागृती केली. तत्परतेने निर्णय घेत त्यावर नियंत्रण ठेवले होते. अनेक नागरिक हे तत्परता व काळजी घेत नसल्याने आता शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील ५२० नागरिकांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आहे. त्यातील ४३९ नागरिकांना घरातच अलगीकरण करण्यात आलले आहे. रोज या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे.आतापर्यंत ८६ स्वॅब तपासण्यांमध्ये १५ रुग्ण हे पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.तर ३९ निगेटिव्ह असून ३२ जणांचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही. कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने आता आयुक्त डांगे यांनी रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी मेडिकल सोडून सर्वच दुकाने आता सायंकाळी ५ ते ८ या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरामध्ये सुरक्षेसाठी व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये तसेच शासनाने दिलेल्या आदेशानुसार सोशल डिस्टसिंग ठेवणे फार गरजेचे आहे. परंतु अनेक ठिकाणी सोशल डिस्टनिंग ठेवत नसल्याचे दिसून येत आहे. जमावबंदी व संचारबंदी असताना कायद्याचे उल्लंघन करत रस्त्यावर नागरिक गर्दी करत आहेत. काम नसतानाही व अत्यावश्यक वस्तू घेण्याच्या बहाण्याने नागरिक गर्दी करत आहेत.
मिरारोड , काशीमीरा, काशीगाव , भाईंदरमधील केबिन रोड ,रावल नगर ,नर्मदा नगर तसेच मिरा रोड शांती नगर परिसरात आज सकाळच्या सुमारास नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर निघालेले दिसत होते. त्यामुळे लॉकडाऊन कुठे गेला असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे आणखी कोरोनाच्या विषानुमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.