पिठी गावात सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याने भीती
बीड - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवनवीन उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु अनेक ठिकाणी त्याचे पालन केले जात नसल्याचे उघडकीस आले आहे.बीड मुख्य रहदारीच्या रस्त्यावरील पिठी गावात सोशल डिस्टनसिंग पाळत नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पाटोदा तालुक्यातील पिठ्ठी या गावात सोशल डिस्टन्सिंग न पाळता त्याचा फज्जा उडवल्याचे फोटोत आपल्याला पहावयास मिळत आहे. एकीकडे कोरोना महामारीने जगात थैमान घातले असतांना अारोग्य विभाग,पोलिस कर्मचारी,पञकार,समाजसेवक माहिती देतात परंतु लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात कोरोना महामारीने अनेकांचे बळी घेतले आहेत आता तरी सुधरा नाहीतर कोरोना आपल्याकडे येऊ शकतो.
पिठी गावात सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याने भीती