नामदेव सानप यांच्या कडुन  संत मिराबाई संस्थानला दहा हजाराची मदत

नामदेव सानप यांच्या कडुन  संत मिराबाई संस्थानला दहा हजाराची मदत
  पाटोदा - सध्या कोरोणाच्या महामारीत लाॅकडाऊन योग्य निर्णयामुळे संकटात सापडलेल्या गोरगरिबांसाठी पाटोदा तालुक्यातील श्री. संत मिराबाई (आईसाहेब) संस्थान महासांगवी मठादिपत्ती ह.भ.प.सानप राधाताई महाराज हे संत आईसाहेब फाऊंडेशन माध्यामातून गोरगरिबांच्या चुली पेटवत आहे.यांच्या कार्याला हातभार म्हणुन महासांगवी चे शेतकऱ्यांचे नेते उपसरपंच नामदेव सानप यांनी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून दहा हजार रुपयांची मदत केली आहे. स्वामी सानप,शिवाजी गर्जे,गणेश खाडे (फौजी) उपस्थित होते.यावेळी नामदेव सानप यांनी सांगितले की संत आईसाहेब फाऊंडेशन हे कोरोना व्हायरसच्या महामारीत कोणी गोरगरीब उपाशीपोटी झोपू नये यासाठी ह.भ.प.राधाताई महाराज पुढे आल्या आहेत. म्हणून आपल सुध्दा माणुसकीच्या नात्याने  योगदान असावे. नक्कीच या संकटात कोणी गोरगरीब उपाशीपोटी झोपणार नाही व कोणी घराबाहेर निघणार नाही.पुढे बोलतांना सांगितले की या पुण्यकर्माने व शासन व प्रशासनाच्या प्रयत्नाने कोरोना वर नक्कीच आपण विजय मिळवू .