कोरोनाच्या विळख्यात सापडलेली उतरकऱ्यांची कुटूंब प्रशासनाच्या मदतीपासून  वंचित ,

कोरोनाच्या विळख्यात सापडलेली उतरकऱ्यांची कुटूंब प्रशासनाच्या मदतीपासून  वंचित ,
चित्रपट निर्माते महेश टिळेकर यांनी दिला मदतीचा हात 


 बीड  : पाटोदा ते  मांजरसुंबा या हम 
रस्त्यालगत गेली दीड महिन्यापासून  वैदू, वडार, व जडी बुट्टी विकणारे  असे ऐकून 15 कुटंब वास्तव्य करून राहत असून सदर कुटूंबातील लोकांना काम नाही त्यामुळे आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असून हाताला काम नाही व पोटाला अन्न नाही, अशी अवस्था त्याची झाली असून पाटोदा तहसीलदारांनी त्यांना फक्त 10 किलो गहू व दोन किलो तांदूळ पंधरा दिवसापूर्वी दिले असून लहान मुले व महिलांनी ही शासकीय मेजवानी किती दिवस खावी असा प्रश्न ही उतरकरी मंडळी विचार करत असुन यांच्या मदतीसाठी चित्रपट निर्माते  महेश टिळेकर यांनी हात पुढे करत पत्रकार संजय सानप, पत्रकार लांडगे यांच्या माद्यमातून आज प्रत्यक्ष किराणा माल देऊन करण्यात आली असुन अडचणीच्या काळात मदत केल्याने गोरी परिवाराने महेश टिळेकर यांचे आभार व्यक्त केले आहेत यावेळी 
सरपंच तसेच मंडळ अधिकारी नानासाहेब राख , तलाठी घरत,  सूर्यकांत डोळसे  आदी  मान्यवर उपस्थित होते.