कोरोना महामारीत समाजाचा चौथा आधारस्तंभ पत्रकार बांधवांना  सौ.चंपावतीताई यांचा मदतीचा हात*

*कोरोना महामारीत समाजाचा चौथा आधारस्तंभ पत्रकार बांधवांना  सौ.चंपावतीताई यांचा मदतीचा हात*
पाटोदा - संपुर्ण जगासह भारतातही कोरोना व्हायरसचा हाहाकार माजला आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन अथक प्रयत्न करीत आहे. ज्यामध्ये प्रशासनासह डाॅक्टर, पोलिस, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, विद्युत पुरवठा कर्मचारी इत्यादींसह अत्यावश्यक सेवा सुविधा पुरविणा-या अनेक विभागातील अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस झटुन आपले कर्तव्य पार पाडत आहेत. यामध्ये समाजाचा चौथा आधारस्तंभ असलेला पत्रकार सुध्दा जिवाची पर्वा न करता  ह्या कोरोना सारख्या महामारीच्या संकटात जनतेला वास्तव मांडून जनजागृती करत आहे.कोरोना सारख्या महाभयंकर महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लाॅकडाऊन सुरु केले आहे. त्यामुळे देशवासीयांना घरात राहायला सक्तीचे केलेले असुन पोलिस, डाॅक्टर, आरोग्य कर्मचारी ह्यांच्याप्रमाणेच पत्रकारांना देखील आपला जीव धोक्यात टाकुन नागरीकांना घरबसल्या जगासह देशातील, जिल्ह्यातील, तालुक्यातील व गाव पातळीवर घडणा-या घडामोडी बातमीच्या रुपात द्याव्या लागत आहेत. उन्हापावसात, उपाशीपोटी, रात्री अपरात्री, वेळी अवेळी बातमीच्या शोधात असणारे तसेच शासन व नागरीकांमधील दुवा असणारे पत्रकार मात्र शासनाच्या दुर्लक्षतेमुळे हलाकीचे जीवन जगत आहेत.यासाठी भाजपाच्या नेत्या सौ.चंपावतीताई पानसंबाळ
यांनी गोरगरिबांसह पाटोद्यातील पत्रकारांना मदत नव्हेतर कर्तव्य म्हणून किराणा सामन,हँडवाॅस,सनिटायझर हँडग्लोज वाटप केले आहे समाजातील अनेक मान्यवर सरपंच, आमदार, खासदार, नगराध्यक्ष, नगरसेवक ते मंत्री झाले. परंतु, कुणीही पत्रकारांच्या मदत देण्याचा साधा प्रयत्नही केला नाही. कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता सामाजिक, राजकीय, शासकीय, क्रिडा, आरोग्य ह्यांसह समाजातील सर्व प्रकारच्या चांगल्या वाईट बातम्या करणारे पत्रकार सद्या कोरोना महामारीच्या परिस्थितीतही जीवावर उदार होऊन आपले कर्तव्य पार पाडत आहेत.ह्यामुळे पाटोद्याची कन्या सौ.चंपावतीताई पानसंबाळ यांनी आपल्या माहेच्या गोरगरिबांसह पत्रकारांना मदत नव्हे त कर्तव्य म्हणून सामान वाटप केले आहे.