बीड जिल्ह्यात आढळला पहिला कोरोना बाधित रुग्ण

बीड जिल्ह्यात आढळला पहिला कोरोना बाधित रुग्ण



बीड- बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात कोरोना रुग्ण आढळला असून  तबलीकीच्या  संपर्कात आलेल्या एका  व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे . रात्री उशिरा हे जाहीर करण्यात आले. बीड जिल्ह्यामध्ये अद्यापपर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नव्हता. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनाने पूर्ण खबरदारी घेतल्यामुळेच एकही रुग्ण आढळला नव्हता. परंतु आता कोरोना सारख्या आजारापासून लांब लांब असलेल्या बीडमध्ये देखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे,आष्टी येथील या रुग्णावर नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत .
  अहमदनगर जिल्ह्यात निजामुद्दीन येथील मरकज च्या धार्मिक कार्यक्रमास हजेरी लावून अनेक परदेशी तबलीकी अहमदनगर सह जामखेड, मुकुंदनगर , राहुरी संगमनेर या भागात येऊन राहिले.त्यांनी जमात मध्ये आल्यानंतर प्रशासनाला न कळवता ते अहमदनगर जिल्ह्यातील विविध भागात राहिले. या परदेशी नागरिकामध्ये कोविड १९ चा संसर्ग असल्याचे त्यांच्या चाचण्या केल्यानंतर आढळून आले. त्यानंतर पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाने मोहीम हाती घेत अहमदनगर जिल्ह्यातील या परदेशी नागरिकांच्या सानिध्यात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. हे तबलीकी ज्या मुकुंदनगर  भागात राहिले त्या भागातील नातेवाईक असलेल्या आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील नागरिकांनी भेटी दिल्याचे अहमदनगर च्या प्रशासनाला  आढळून आले. यासंदर्भात त्यांनी बीड प्रशासनाला कळवून  त्याची माहिती दिली. या एका  नागरिकाचा स्कॅब अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .बीड जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला आहे. बाहेरून कोणताही व्यक्ती जिल्ह्यात प्रवेश करून शकणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली जात असताना, बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नगरकडून याची लागण झाली .यासंदर्भात आष्टी तालुक्यातील या गावाच्या सीमा बंद करण्यात आल्या असून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.