उत्तर प्रदेशला घेऊन जाणाऱ्या टेम्पोवर कारवाई 

उत्तर प्रदेशला घेऊन जाणाऱ्या टेम्पोवर कारवाई


मिरारोड - मिरारोड कनाकीया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौरवसिटी येथून रात्री १ वाजता उत्तरप्रदेशला टेम्पोमध्ये बसून प्रवाशी वाहतूक करत असताना पोलिसांनी अटक करून कारवाई केली आहे.
   कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. संचारबंदी व लॉकडाऊन केल्यामुळे बाहेर राज्यातील अनेक नागरिक हे अडकून पडले आहेत. अनेकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे काही नागरिक हे चोरून आपल्या राज्यात व घरी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. अशीच घटना मिरारोड येथील गौरवसिटी बिल्डींग समोर टेम्पो नं एमएच.०४.एचवाय-९७३२ हा एक टेम्पो जप्त करून गुन्हा नोंद केला आहे. चालक राजेंद्र भईदुर यादव वय ३८ वर्षे यास अटक केली आहे. टेम्पो चालक हा मेरीगोल्ड येथील झोपडपट्टीत राहाणारे १६ प्रवाशी अवैधपणे टेम्पोत भरून  ते नाशिक मार्गे उत्तरप्रदेशला घेऊन जात होता.
पोलिसांनी गस्त घालत असताना त्या टेम्पोची तपासणी केली असताना टेम्पोच्या समोरील काचेवर मिरा भाईंदर मनपा प्रभाग क्र ३ येथील जेवण वाटप पथक असा फलक लावून प्रवाशी वाहतूक करीत होता. या प्रवाशांना त्यांच्या राहत्या घरी पुन्हा सोडण्यात आले आहे.
या टेम्पो चालकांवर भादविस १८८, २७०, २७१ , सह मोटार वाहन कायदा कलम ६६/१९२(अ) सह साथ रोग प्रतिबंध कायदा कलम ३/११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील हे तपास करत आहेत.