दिल्लीत झालेल्या तबलिगी कार्यक्रमात मीरा भाईंदरच्या १५ नागरिकांचा समावेश

दिल्लीत झालेल्या तबलिगी कार्यक्रमात मीरा भाईंदरच्या १५ नागरिकांचा समावेश


मिरारोड - दिल्ली येथील निजामुद्दीन भागात तबलिगी जमातिचा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात  मीरा भाईंदरमधील १५ जणांनी सहभाग घेतला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 
     दिल्लीतील निजामुद्दीन येथे मार्च मध्ये झालेल्या धार्मिक कार्यक्रमात  मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. सहभागी झालेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झालेली आहे. हे  देशभरात सगळीकडे गेलेले आहेत. त्यामुळे पूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या कार्यक्रमासाठी देशाच्या कोणकोणत्या भागातुन नागरिक सहभागी झाले होते याची माहिती आता त्या त्या भागातील पोलीस व पालिका प्रशासनास दिली जात आहे. त्या अनुषंगाने मीरा भाईंदर मधुन १५ जणं गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा राहण्याचा पत्ता शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाणे हद्दीतील आहे. नयानगर पोलीस ठाणे  ५ , नवघर पोलीस ठाणे ४, काशिमीरा पोलीस ठाणे  ३, भाईंदर पोलीस ठाणे २ तर मीरारोड पोलीस ठाणे १  असे त्यांचे वास्तव्यास होते. परंतु यातील केवळ दोघेच जण शहरात  राहत असल्याची माहिती मिळत आहे. तर काही जण हे अनेक महिन्यां पासुन येथे रहात नसल्याचे समोर आले आहे.
काही जण हे दिल्ली येथूनच त्यांच्या मूळगावी गेल्याचे बोलले जात आहे.  शहरात सापडलेल्या दोघांनाही घरीच अलगीकरण कक्षात ठेवले असुन पालिका व पोलीस त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहेत. पोलीस आणि पालिकेने या १५ जणांची पडताळणी केली असता १५ पैकी नयानगर व नवघर पोलीस ठाणे हद्दीत प्रत्येकी एक जणच राहत्या पत्यावर आढळुन आले आहेत. नवघर पोलीस ठाणे हद्दीत रहात असलेला इसम हा १३ मार्च ला गेला होता व २१ मार्च रोजी शहरात परतलेला आहे.  दोघांना त्यांच्या राहत्या घरातच देखरेखी खाली ठेवण्यात आले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळुन आलेले नाही असे सुत्रांनी स्पष्ट केले.