"ऊज्वला योजनेंतर्गत" १४ हजार लाभार्थी महीलांना पुढील तीन महीन्यांसाठी घरगुती गॅस सिलींडर मोफत मिळणार
पाटोदा - कोरोनाचा हाहाकार व लॉकडाऊनमुळे हतबल झालेल्या गरीब महिलांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत देशातील ८ कोटी ३० लाख महिलांना पुढील तीन महिन्यांसाठी मोफत घरगुती गॅस सिलिंडर देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती त्यानुसार पाटोदा तालुक्यात ऊज्वला याेजनेतील लाभार्थी महीलांची १४ हजार संख्या असुन त्यांना पुढील तीन महीन्यांसाठी मोफत गॅस सिलींडर मिळू शकणार आहे .
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे लोकांना याचा फटका बसणार आहे. यासाठी केंद्र सरकारने मोठी मदत जाहीर केली आहे. महिलांचाही यात विचार करण्यात आलाय. त्यांच्यासाठी केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेंतर्गत महीलांना पुढील तीन महिन्यांसाठी मोफत घरगुती गॅस सिलिंडर मोफत दिले जाणार आहे. घोषणा केल्यानुसार पाटोदा तालुक्यात या ऊज्वला योजनेतील लाभार्थीची संख्या १४ हजारापर्यंत असुन शासन आदेश प्राप्त झाल्यानंतर या लाभार्थीना पुढील एप्रिल, मे, व जुन अशा तीन महीन्यांसाठी घरगुती गॅस चा सिलींडर हा मोफत मिळणार आहे. या संदर्भात शासनाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर त्या प्रकारे संबंधित गॅस एजन्सीला सुचना देऊन आवश्यक ती प्रक्रीया पुर्ण करुन ऊज्वला योजनेतील लाभार्थ्यांना या योजनेतुन घरगुती गॅस सिलींडर मिळणार आहे .
चौकट -
जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या सुचनेनुसार सध्या प्रत्येक किराणा दुकानात सर्व किराणा वस्तु डाळी, तेल, साखर, शेंगादाणे अशा वस्तुचे भाव स्थिर असुन संचारबंदी मुळे कोणत्याही किराणा मालाचा भाव वाढलेला नाही जर कुठलाही किराणा दुकानदार अडवणुक करुन जाणीवपर्वक भाव मनाने वाढवत असेल तर त्या त्या गावातील नागरिकांनी तलाठी यांना संपर्क साधावा. अशा दुकानांची माहीती दिल्यास अशा दुकानदारांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे पुरवठा विभागाचे नायब तहसिलदार सुनिल ढाकणे यांनी स्पष्ट केले आहे .