कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी आमदार संदिप क्षिरसागर आले धावून

कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी आमदार संदिप क्षिरसागर आले धावून


अखेर सेवा समाप्त केल्याचा आदेश २४ तासांच्या आत प्रशासनाने घेतला वापस


बीड-  जिल्हयातील महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत कार्यरत असणाऱ्या २८ कर्मचाऱ्यांची  सेवा जिल्हा प्रशासनाने कोणतीही पूर्व कल्पना न देता समाप्त केली होती. यानंतर या २८ कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात होते, परंतु सदरील बाब लक्षात येताच बीड विधानसभा मतदार संघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी या कर्मचाऱ्यांच्या              पाठीशी उभे राहिले त्यामुळे सेवा समाप्तीचा आदेश जिल्हा प्रशासनाने २४ तासांच्या आत वापस घेतल्याने या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर मग्रारोहयो कंत्राटी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आ. संदिप क्षीरसागर यांचे आभार व्यक्त करण्यात आले. आमदार संदीप यांच्यामुळेच आमचा हा प्रश्न मार्गी लागल्याची प्रतिक्रिया कृती समितीच्या वतीने देण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उपासमारीची वेळ आली आहे. परन्तु एकीकडे रोजगार हमीची कामे सुरु करण्यासाठी शासन आदेश देत आसताना जिल्हा प्रशासनाने मात्र २८ जन रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या अभियंता आणि लिपिकांची सेवा समाप्त करून या कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आणली होती. मात्र अशावेळी कर्तव्य दक्ष आमदार संदिप क्षीरसागर हे या कर्मचाऱ्यांसाठी धावून आले. अखेर प्रशासनाला हा आदेश रद्द करण्यासाठी पाठपुरावा केला, परिणामी काही तासातच हा आदेश मागे घेत सदरील कर्मचार्यांना सेवेत पुन्हा सामाऊन घेतले. 
    कंञाटी कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन याबाबत आमदार संदिप क्षिरसागर यांनी सभागृहात लावुन धरावा तसेच शासनाच्या विविध विभागात असेच कंञाटी कर्मचारी आहेत त्यामध्ये कृषी विभागातील पाणलोट कर्मचारी,आरोग्य विभाग,102 अंँम्बुलन्स वरिल ड्रायव्हर व विविध विभागातील कंञाटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करण्यात येत आहे.