बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांचा परतीचा प्रवास सुरू
भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के ऊसतोड मजुरांच्या मदतीला गेले धाऊन येणाऱ्या मजुरांची केली जेवणाची व्यवस्था
बीड- बीड जिल्हा हा ऊसतोड मजुराचा जिल्हा म्हणुन आेळखला जातो. पोटाची खळगी भरण्यासाठी लोक राज्यातील व परराज्यातील साखर कारखान्यावर जातात. आपली उपजिवीका या मजुरीवर भागवतात यावर्षी माञ जगावर व देशावर कोरोना संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव आल्यामुळे त्यांना येणासाठी विविध जिल्ह्यातुन यावे लागत असल्यामुळे त्यांची तपासणी करूनच त्याना जिल्ह्यात घेतले जात आहे. बीड उस्मानाबाद हद्दीतील चौसाळा चेक पोस्टवर यांची आरोग्य विभागाकडुन तपासणी करूनचं पुढे त्यांना घरी पाठवले जात आहे.
भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के ऊसतोड मजुरांच्या मदतीला धाऊन गेले व येणाऱ्या मजुरांची जेवणाची व्यवस्था केली आहे.
म्हस्के यांनी मागिल वर्षी देखील दुष्काळात छावणीच्या माध्यमातुन जनावरांच्या चारा पाणी व त्यांच्या मालकांची भुक भागवली होती. अशा संकट समयी मदत केल्यामुळे मजुरांनी म्हस्के यांचे आभार मानले आहेत.