चारशे गरजू नागरिकांना स्वताच्या  शेतातील गहु केला वाटप

चारशे गरजू नागरिकांना स्वताच्या  शेतातील गहु केला वाटप
 
काँग्रेसचे ता अध्यक्ष गणेश कवडे यांचा उपक्रम


पाटोदा -  शहरातील राष्ट्रीय काँग्रेसचे
 ता.अध्यक्ष गणेश कवडे यांनी कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर घरातच कामधंदा सोडून बसलेल्या गरीब गरजू चारशे नागरिकांना स्वताच्या शेतातील गहु काँग्रेस मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
पाटोदा शहरात गत अनेक दिवसापासून गणेश कवडे यांचे शेतकऱ्यांसाठी व सामाजिक कार्यात वेगळे वलय आहे. सध्या कोरोना व्हायरसमुळे अनेक गोरगरीब कामगार लाॅकडाऊन मुळे काम सोडून घरातच बसून आहेत. त्यामुळे त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे या गरीब नागरिकांना राष्ट्रीय काँग्रेसचे ता.अध्यक्ष गणेश कवडे यांनी ४०० गरीब कुटुंबांना स्व:ताच्या शेतातील गहु कुटुंब गणित पाच किलो गहू राष्ट्रीय काँग्रेसचे जि.उपाध्यक्ष तथा माजी सरपंच  जुबेर चाऊस यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते उमर चाऊस, राहुल बामदळे, इम्रान शेख,युवराज जाधव,मुन्ना अन्सार,गोविंद बामदळे, पप्पु सवासे,अविनाश सवासे उपस्थित होते. दरम्यान गणेश कवडे यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतूक केले जात आहे.