मीरा भाईंदर मध्ये ३ रुग्ण कोरोना पॉझिटिव 

मीरा भाईंदर मध्ये ३ रुग्ण कोरोना पॉझिटिव 


मिरारोड - मीरा भाईंदरमध्ये अद्यापपर्यंत एकही  कोरोना पॉझिटीव रुग्ण नव्हता .मिरारोड येथील नयानगर भागात एकाच घरातील तीन रुग्नांना कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच त्याच घरातील दोन रुग्णाचा अहवाल आणखी आला नसून त्यांना देखील कोरोनाची लागण झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तीन दिवसापूर्वी मिरा रोड भागातील नया नगर परिसरात ५५ वर्षीय व्यक्तीला करोनची लागण झाल्याचे आढळून आले आहे. हा रुग्ण गेल्या काही काळापासून कर्करोग आणि मधुमेहामुळे त्रस्त होता. आठ दिवसांपूर्वी त्याला निमोनिया झाल्यामुळे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. करोनाची लक्षणे या रुग्णात आढळून येत असल्यामुळे रुग्णालयाकडून रुग्णाची COVID-19 तपासणी करण्यात आली. त्या अहवालात रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. ही माहिती तातडीने  मिरा भाईंदर महानगरपालिकेला करण्यात आली. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून रुग्णाला तातडीने मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या घरातील पाच सदस्यांना देखील तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात नेण्यात आले होते.  त्यापैकी त्या व्यक्तीची पत्नी, मुलगा आणि मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. तर अद्यापही त्या व्यक्तीचा आणि त्यांच्या एका मुलाचा अहवाल आला नाही आहे. तसेच हे रुग्ण ज्या नागरिकांच्या संपर्कात आले त्या नागरिकांचा प्रशासनाकडून शोध घेण्यात येत आहे.
आता पर्यंत मिरा भाईंदरमध्ये ६५७ नागरिक हे परदेशातुन आले असून या पैकी ४०८ नागरिकांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे तर २४९ नागरिकांना १४ दिवसांच्या तपासणीनंतर घरी सोडण्यात आले. तसंच ३७३ नागरिकांना घरातच अलगीकरण करण्यात आले आहे. रोजच  या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. सोमवारी पाठवण्यात आलेल्या १७ स्वॅब तपासण्यांमध्ये ३ रुग्ण हे पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे.