आमदार बाळासाहेब आजबे यांचा अभूतपूर्व  पॅटर्न मोफत भाजीपाला वाटपा मुळे शेतकऱ्यांचा झाला सन्मान तर सामान्य जनतेला मिळाली मदत

आमदार बाळासाहेब आजबे यांचा अभूतपूर्व  पॅटर्न मोफत भाजीपाला वाटपा मुळे शेतकऱ्यांचा झाला सन्मान तर सामान्य जनतेला मिळाली मदत
 
आमदार आजबे यांचा पॅटर्न महाराष्ट्रातील प्रत्येक आमदाराने वापरला तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महाराष्ट्र राज्याला नक्कीच मदत होईल व शेतकरी सन्मानाने जगेल तर गोरगरीब सामान्य जनतेला मदत मिळेल आणी प्रशासनाचा ताणही कमी होईल 
पाटोदा -  जगाचा पोशिंदा म्हणून शेतकरी बांधवाकडे पाहिले जाते जगाचा पोशिंदा शेतकरी राजा कितीही मोठे संकट आले तरी  कुणापुढे झुकणार नाही व्याजाने,उसनवारी पैसे काढतील पण कुणा पुढे हात पसरणार नाहीत हा बळीराजा महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोना व्हायरसणे थैमान घातले आहे या पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 3 मे पर्यंत लॉकडाउन वाढवल्याने पुर्ण पणे अडचणीत सापडला असताना देखील शेतकरी स्वाभिमानाने जगणार ह्याची कल्पना शेतकऱ्याचे नेते आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांना चांगली माहिती असल्याने शेतकऱ्यांना सन्मान मिळाला पाहिजे व त्यांना जगण्यासाठी दोन रुपये मिळाले पाहिजे तसेच कोरोनाच्या विषाणूला रोखण्यासाठी सध्यातरी एकच पर्याय घरात बसले पाहिजे म्हणून लोकांनी घराच्या बाहेर येऊ नये हा दृष्टिकोन समोर ठेवून आमदार बाळासाहेब आजबे यांनी मतदार संघातील लोकांना जीवनावश्यक वस्तू जागेवर कशा देता येतील यादृष्टीने आष्टी, पाटोदा शिरूर मतदार संघात आमदार बाळासाहेब आजबे यांनी मतदारसंघातील शेतकऱ्यांकडून माल विकत घेऊन तो माल गरजू व गोर गरीब कुटुंबांसाठी मोफत भाजीपाला वाटप करत असल्याने आमदार बाळासाहेब आजबे यांच्या अभूतपूर्व पॅटर्नमुळे तीन  चांगले फायदे झाले आहेत 1.)शेतकऱ्यांचा माल विकू लागल्याने शेतकऱ्यांना फायदा मिळू लागल्याने बळीराजा शान के सात सन्मानाने जगू लागला आहे.
2).मतदार संघातील शेतकऱ्यांकडून भाजीपाला विकत घेऊन तो लॉकडाऊन मुळे रोजगार बंद होऊन  अडचणीत सापडलेल्या मतदारसंघातील गोरगरीब सामान्य जनतेला मोफत वाटण्यात येत आहे, त्यामुळे गरजवंतांना मदत मिळाली तसेच 3) भाजीपाला घरीच मिळू लागल्याने लोक भाजीपाला घेण्यासाठी घरा बाहेर पडत नाहीत यामुळे रस्त्यावरची गर्दी आपोआप कमी  झाली असून यामुळे प्रशासनाला चांगली मदत झाली आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आष्टी मतदारसंघातील प्रशासन यशस्वी होत असल्याचे दिसत आहे यामुळे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या अभूतपूर्व पॅटर्न मुळे मतदारसंघातील शेतकऱ्यांना मिळाला सन्मान तर गोरगरीब सामान्य जनतेला मिळू लागली मदत यामुळे आमदार आजबे यांचा पॅटर्न जर महाराष्ट्रातील प्रत्येक आमदारांनी राबवला तर महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात नक्कीच मदत होणार आहे. त्यामुळे सर्वांनी आपापल्या परिमे काळजी घेणे गरजेचे आहे.